सारा न्यूज नेटवर्क -
चर्मकार (चांभार) समाजाबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या नदीम खान व ते प्रसारित करणाऱ्या युट्यूब चैनलवर अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा करा;
"संत रविदास चर्मकार युवा महासंघ" ता. जत जिल्हा सांगली यांची मागणी...
सांगली /जत (प्रतिनिधी) :- "संत रविदास चर्मकार युवा महासंघ" महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ आत्माराम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष निशांत भाऊ बुरुटे यांच्या अध्यक्षतेखाली कठोर कार्यवाही करण्यात यावी यासाठी जत पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक श्री.संदीप कोळेकर यांना सुनील चौगुले ,साहेबराव बुरुटे,लखन देशमुख यांच्या वतीने निवेदन देवुन अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी.
महाराष्ट्र राज्यातील संविधानप्रेरित व्यवस्थेमध्ये प्रत्येक समाजाच्या सन्मानाची रक्षा करणे ही प्राथमिक जबाबदारी आहे. परंतु, अलीकडेच चर्मकार चांभार समाजाबद्दल एक जाणीवपूर्वक अपमानकारक आणि अपमानास्पद वक्तव्य करून समाजामध्ये फूट पाडण्याचा, चिथावणी देण्याचा आणि शांतता भंग करण्याचा घृणास्पद प्रयत्न करण्यात आला आहे.
नदीम खान या व्यक्तीने चोर चांभार असे अत्यंत अवमानकारक आणि जातिवाचक वक्तव्य केले आहे, जे एका संपूर्ण समाजाच्या स्वाभिमानावर आघात करणारे आहे. या वक्तव्यानंतर VIRAL BOLLYWOOD या यूट्यूब चॅनलने या प्रकाराचे प्रसारण करून हे विषारी विधान समाजामध्ये अधिक पसरवले. या केवळ चर्मकार समाज नाही, तर इतर अनेक घटकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. घटनेमुळे तसेच, नुकत्याच घडलेल्या सैफ अली खान प्रकरणात संबंधित चॅनलची भूमिका व वृत्तीही अत्यंत एकतर्फी व चिथावणीखोर असल्याचे स्पष्ट दिसत आहे. अशा प्रकारची माध्यमांची गैरवर्तणूक समाजाच्या ऐक्याला तडा देणारी आहे.
ही घटना अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, 1989 (अट्रॉसिटी कायदा) आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित तरतुदींच्या अंतर्गत गंभीर स्वरूपाची असून, दोषीना कड़क शासन होणे ही काळाची गरज आहे.
"संत रविदास चर्मकार युवा महासंघ" च्या मागण्याः
१. नदीम खान याच्यावर अट्रॉसिटी कायद्याच्या अंतर्गत तातडीने गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी.VIRAL BOLLYWOOD या युट्यूब चैनलला तात्काळ बंद करून त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
२. यापुढे समाजातील कोणत्याही घटकांविरोधात अपमानकारक वक्तव्य करणान्या व प्रसारित करणाऱ्या माध्यमांवर कठोर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक ती पायले उचलावीत.
३. चर्मकार (चांभार) समाजाच्या सन्मानासाठी या प्रकरणाची तात्काळ न्यायालयीन चौकशी करण्यात यावी व दोर्षीना कठोर शिक्षा व्हावी.
जर प्रशासनाने त्वरित व कठोर पावले उचलली नाहीत, तर या घटनेमुळे समाजात प्रचंड रोष निर्माण होऊन सामाजिक संतुलन बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्यासारख्या संवेदनशील व न्यायप्रिय नेतृत्वाकडून आम्हाला तातडीने कारवाईची अपेक्षा आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment