सारा न्यूज नेटवर्क -
मनपा मराठी मुलांची केंद्रशाळा हेडक्वॉर्टर सोलापूर येथील क्रीडा महोत्सव जल्लोषात..
सोलापूर (प्रतिनिधी) :- दि-11 जानेवारी 2025 - मनपा मराठी मुलांची केंद्रशाळा हेडक्वॉर्टर सोलापूर येथे 10 जानेवारी 2025 ते 11 जानेवारी 2025 या दोन दिवसांत क्रीडा महोत्सव साजरा करण्यात आला.
सध्याच्या काळात विद्यार्थ्यांच्या हातातील मोबाईल शारीरिक समस्या निर्माण करू लागला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर करून मातीशी नातं घट्ट करण्यासाठी मनपा मराठी मुले हेडक्वॉर्टर येथे क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. दोन दिवशीय क्रीडा महोत्सव मध्ये लंगडी,लिंबू-चमचा 100 मीटर,200 मीटर धावणे, खोखो संगीत खुर्ची अशा देशी खेळांचे आयोजन करण्यात आले. सुसज्ज मैदान, आकर्षक सजावट, विद्यार्थ्यांचा जल्लोष, चित्तथरारक खो-खो चा सामना, पालक-शिक्षक संगीत खुर्ची, पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग असणाऱ्या स्पर्धा हे या क्रीडा महोत्सवाचे महत्त्वाचे आकर्षण ठरले.
या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बीट पर्यवेक्षक श्री.मुंढे साहेब, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सौ.मीनाक्षीताई पेठे, क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री.आदर्श(भैय्या)धडे, पत्रकार श्री रतन बनसोडे, सोलापूरचे सायकलरत्न फारुख सय्यद, श्रीकांत बोराडे व पालक वर्ग आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर क्रीडा महोत्सवामध्ये सिद्धिक शेख यांनी आपल्या दातृत्वातून विजयी व यशस्वी खेळाडूंना 2 ट्रॉफी 20 गोल्ड मेडल आणि 20 रौप्यपदक दिले. श्री आदर्श(भैय्या)धडे यांनी सुसज्ज मंडप उपलब्ध करून दिला.तसेच झोन क्र- 4 चे अभियंता श्री. सलगर साहेब यांनी विद्यार्थ्यांना प्रशस्त मैदान सपाटीकरण करून दिले.
क्रीडा महोत्सव यशस्वी होण्यासाठी राजू हाळदे,गिरीजा महिंद्रकर,दयानंद गायगवळी, जगदेवी तोडकरी यांनी मेहनत घेतली.
क्रीडा महोत्सवात पंच म्हणून श्री स्वप्निल चाबुकस्वार, श्री विशाल सोनलकर यांनी काम पाहिले. उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीम.सविता जाधव, सूत्रसंचालन श्रीम. शिरीन शेख तर आभार प्रदर्शन श्री.सोमनाथ सोनलकर यांनी केले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment