Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, January 26, 2025

सोलापूर जिल्हयातील उत्कृष्ट रेशीम कोष उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना पुरस्कार प्रदान..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर जिल्हयातील उत्कृष्ट रेशीम कोष उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना पुरस्कार प्रदान.. 

सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर जिल्हयातील ११ तालूक्यामध्ये १०१७  शेतकऱ्यांकडे १२६०.०० एकरावर रेशीम उद्योग चालू असून त्यापैकी सन २०२४-२५ मध्ये उत्कृष्ट रेशीम कोष उत्पादन घेणाऱ्या व रेशीम शेतीतून लक्षाधीश झालेल्या खालील सहा शेतकऱ्यांना मा.पालकमंत्री, ना जयकुमार गोरे व मा. जिल्हाधिकारी श्री. कुमार आशीर्वाद यांचे स्वाक्षरीचे प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले. 

पुरस्कार प्राप्त शेतकरी नांवे व उत्पादन तपशील-


सध्या जिल्हयात महारेशीम नोंदणी अभियान चालू असून रेशीम शेतीसाठी तुती लागवड करण्यास इच्छूक असलेल्या लाभार्थ्यांनी नांव नोंदणी जिल्हा रेशीम कार्यालय मौजे हिरज, ता. उ. सोलापूर, जि. सोलापूर येथे करावी. व रेशीम उद्योगामधून शेतकऱ्यांनी लक्षाधीश व्हावे. लवकरच सोलापूरजिल्यामध्ये Soil to Fabric प्रकल्प राबवीत आहोत. ज्यामूळे रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना सोलापूर जिल्या मध्येच स्वतःचा रेशीम कोष विक्री करणे सोईचे होणार आहे व सोलापूर जिल्यातील कुशल विणकरांना कपडा निर्मीती पर्यन्त रोजगार उपलब्ध होईल. ज्यामूळे सोलापूर जिल्हयाची आर्थिक  उन्नती होईल. असे जिल्हयाचे रेशीम विकास अधीकारी विनित सुनिता सुरेश पवार यांनी आव्हान केले.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment