Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, January 11, 2025

" कै.भाऊ साहेब आप्पा जाधव प्राथमिक विद्यालय" या शाळेला मुख्यमंत्री आदर्श,सुंदर व स्वच्छ शाळा पुरस्कार...

 


सारा न्यूज नेटवर्क - 

अभिनंदन - अभिनंदन - अभिनंदन 

" कै.भाऊ साहेब आप्पा जाधव प्राथमिक विद्यालय" या शाळेला 

 मुख्यमंत्री आदर्श,सुंदर व स्वच्छ शाळा पुरस्कार... 

पुणे (प्रतिनिधी) :- येरवडा प्रभाग येथील "कै भाऊ साहेब आप्पा जाधव शाळा" या पुणे महानगरपालिकेच्या शाळेला 

  "मुख्यमंत्री आदर्श,सुंदर व स्वच्छ शाळा" 

या स्पर्धेत पुणे जिल्ह्य़ा मध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. 

तसेच येरवडा विभागा मध्ये सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक मिळवला आहे.


  यावेळी जनसेवक डाॅ सिध्दार्थ धेंडे मा उपमहापौर वार्ताहरांशी बोलताना सांगितले की, मनपाच्या शाळेला हा क्रमांक मिळाला त्याचा सार्थ अभिमान वाटतो.

मी सर्व मनपा अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी व पालक यांचे कौतुक करतो की या शाळेवर आपण विश्वास ठेवतो.

२०१२ मध्ये या शाळेचे पालकत्व स्विकारले तेव्हा पटसंख्या ही २१९ होती, आज ती १२०० आहे सर्व भौतिक सुविधा या मध्ये देण्याचा मी सातत्याने प्रयत्न करित आहे व येथील शिक्षक ही मेहनत घेत आहेत. 

  आपण सर्व मिळून एक आदर्श शाळा व प्रभाग करुयात हेच आपले ध्येय आहे असे त्यांनी सांगितले.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment