Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, January 25, 2025

ब्रिलीयंट ग्रुप चा आदर्श पत्रकार पुरस्कार यशवंत पवार यांना प्रदान अनेक मान्यवरांची उपस्थिती..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

ब्रिलीयंट ग्रुप चा आदर्श पत्रकार  पुरस्कार यशवंत पवार यांना प्रदान अनेक मान्यवरांची उपस्थिती.. 

सोलापूर (प्रतिनिधी ):- शहरातील ब्रिलीयंट न्यूज चॅनल च्या 5 व्या वर्धापन दीनानिमित्त ब्रिलीयंट ग्रुप च्या वतीने समाजात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीना पुरस्कार देण्यात आला.

पत्रकार सुरक्षा समिती चे प्रदेश अध्यक्ष तथा साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्राचे संपादक यशवंत पवार यांनी गेल्या दहा वर्षांपासून पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून समाजातील वंचित पिढीत अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त लोकांच्या न्याय हक्कासाठी आपली पत्रकारिता पणाला लावून तळागाळातील लोकांचे प्रश्न प्रशासन दरबारात मांडून त्यांचे प्रश्न सोडवण्यचा प्रयत्न करत असल्याने यशवंत पवार यांच्या  कार्याची दखल घेऊन ब्रिलीयंट ग्रुपच्या वतीने  यशवंत पवार यांना आदर्श पत्रकार म्हणून पुरस्कार देण्यात आला  सन्मान चिन्ह व शाल देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमास  पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर विद्यापीठ सोलापूर चे कुलगुरू डॉ प्रकाश महानवर ब्रिलीयंट ग्रुप चे अध्यक्ष इम्तियाज अक्कलकोटकर युसूफ पीरजादे प्रा भोजराज पवार डॉ तुळसी मेहरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंत पवार यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर जिल्हा संघटक सादिक शेख जिल्हा सचिव अंबादास गज्जम शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी कार्याध्यक्ष राजू वग्गू समन्वयक लक्ष्मण सुरवसे उपस्थित होते

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे



No comments:

Post a Comment