सारा न्यूज नेटवर्क -
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त सोलापुरात अभिवादन
पत्रकार कृती समिती व अप्पासाहेब लंगोटे मित्रपरिवार कडून विनम्र अभिवादन..
सोलापूर (प्रतिनिधी) :- पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त आज सोलापूर शहरात उत्साहात अभिवादन करण्यात आले. पत्रकार कृती समिती व अप्पाश्री लंगोटे मित्र परिवाराच्या वतीने चार हुतात्मा पार्क चौक येथील राजमातांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र आदरांजली वाहण्यात आली.
लोककल्याणकारी कारभाराचा गौरव :
कार्यक्रमात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या न्यायप्रिय, धर्मनिष्ठ व लोककल्याणकारी कारभाराचा गौरव करण्यात आला. मालवा प्रांताचा सर्वांगीण विकास, काशी विश्वनाथ ते सोमनाथ मंदिरांपर्यंत देशभर केलेले जीर्णोद्धार, जलसंधारणाची कामे व स्त्रियांना दिलेला सन्मान या कार्याचा विशेष उल्लेख करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी राजमातांच्या विचारांचा व कार्याचा आदर्श समाजापुढे कायम ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला.
अप्पासाहेब लंगोटे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, "अहिल्यादेवींचे प्रशासन आजच्या राज्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक आहे. त्यांनी प्रजेला आपले कुटुंब मानले. त्यांचा आदर्श घेऊनच समाजकार्य केले पाहिजे."
या प्रसंगी पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब वाघमोडे, नितीन करजोळे, मिलिंद प्रक्षाळे, अशोक ढोणे, सिध्दाराम नंदर्गी, अकबर शेख, विश्वनाथ बिराजदार, विजयकुमार झुंजा, नरेंद्र संब्बन, उपेंद्र गायकवाड, सुधीर ढोले यांच्यासह पत्रकार बांधव, माहिती अधिकार कार्यकर्ते व विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:
Post a Comment