सारा न्यूज नेटवर्क -
महापालिका निवडणुकीचे सर्व अधिकार फारूक शाब्दींकडे - इम्तियाज जलील
सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत सोलापुरात एमआयएम पक्ष कुणासोबतसुद्धा युती करणार नाही. जेव्हा आम्ही महाविकास आघाडीकडे युतीसाठी हात पुढे करतो, तेव्हा ते सहकार्य करत नाहीत. जेव्हा त्याचा पराभव होतो, तेव्हा ते पराभवाचे खापर एमआयएम पक्षावर फोडत युतीसाठी हात पुढे करतात असे सांगत सोलापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षासोबत जायचे की नाही याचा निर्णय स्थानिक नेते घेतील. एमआयएम मात्र महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणूक पूर्ण ताकदीने लढविणार आहोत. मागील काही वर्षापासून पक्षाची ताकद वाढली आहे, ती या निवडणुकीत दाखवून देऊ अशी भूमिका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मांडली. इम्तियाज जलील शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शहराध्यक्ष फारुक शाब्दी, निरीक्षक अन्वर सादात, शौकत पठाण, अजहर हुंडेकरी यावेळी उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment