Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, June 5, 2025

बंजारा भाषेतील "गोरबोली अन अक्षर" ओळख पुस्तकाचा समावेश करण्याची मागणी...मा. सहाय्यक आयुक्त तथा अध्यक्ष, सेवा फाऊंडेशन श्री प्रकाश राठोड

 


सारा न्यूज नेटवर्क - 

बंजारा भाषेतील "गोरबोली अन अक्षर" ओळख पुस्तकाचा समावेश करण्याची मागणी...मा. सहाय्यक आयुक्त तथा अध्यक्ष, सेवा फाऊंडेशन  श्री प्रकाश राठोड


सोलापूर (प्रतिनिधी) :- नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्राथमिक शिक्षणात मातृभाषेतील शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले आहे. त्यामुळे आता प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना स्वतःच्या बोलीभाषेत शिकण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांना (Students) आपल्या परिसरातील बोली भाषेतून शिकता यावे, यासाठी एनसीईआरटीने तब्बल 117 बोलीभाषेतील (Dialect) पुस्तके तयार केली आहे. बंजारा भाषिक विद्यार्थीसाठी बंजारा बोलीभाषेतील पुस्तक निर्मिती व बंजारा संस्कृतीचा एनसीईआरटीच्या पाठ्यक्रमात समावेश केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान (Union Minister Dharmendra Pradhan) यासह एनसीईआरटी व सिआईआईएल संचालकांकडे मागणी केली आहे


देशभरात बोलल्या जाणाऱ्या गोरबोली (बंजारा भाषा)‘या’ बोलीभाषेतील पुस्तकाचा समावेश नसल्याने जगभरातील बंजाराबांधव आश्चर्य व्यक्त करत आहे!

एनसीईआरटीने प्रायमर सिरीजमध्ये गोंडी, कोरकू, बोडो, खान्देशी, भिली, डोगरी, गारो, खासी, लडाखी, कोलामी, लोथा, मोघी, मुंडा अशा विविध बोलीभाषांच्या पुस्तकाचा समावेश केलेला आहे. परंतु काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत वसलेल्या ऐतिहासिक व वैभवशाली संस्कृती जोपासणाऱ्या बंजारा समाजाच्या मातृभाषेतील पुस्तकांचा समावेश नसल्याचे केंद्र आणि राज्य सरकारच्या लक्षात आणून दयावे.‌   यंदाच्या नव्या सत्रात बंजारा भाषिक विद्यार्थ्यांना मात्र या द्वीभाषिक बोलीभाषेतील पुस्तकांच्या संधीपासून मुकण्याची शक्यता अधिक दिसून येते. बंजारा भाषा ही भारतभर बोलली जाणारी इंडो आर्य परिवारातील एक समृृद्ध बोली भाषा  आहे जॉर्ज ग्रियर्सन यांनी केलेल्या’ द लिंग्वीस्टीक सर्व्हे ऑफ इंडिया’ अंतर्गत सुमारे 364 भारतीय भाषा व बोलींचा सर्व्हे (Survey of Languages ​​And Dialects) करण्यात आला होता. यामध्ये पहिल्यांदाच बंजारा भाषेचा उल्लेख आलेला असून, ही भाषा चवथ्या शतकापासून बोलली जात असल्याचे नमूद केले आहे.

उक्त नमूद बाबींचा विचार करता बंजारा विद्यार्थ्यांना आपल्या बोलीभाषेतुन शिक्षण घेण्यासाठी *मा.सहाय्यक आयुक्त तथा सेवा फाऊंडेशन अध्यक्ष श्री प्रकाश राठोड आणि सौ शैला राठोड लिखित "गोरबोली अन अक्षर ओळख*"  हे पुस्तक बंजारा बोली भाषा बोलणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी नव्या राष्ट्रीय धोरणानुसार प्राथमिक शिक्षणात समाविष्ट करावे अशी मागणी केली आहे.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment