Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, June 21, 2025

चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व ज्युनिअर कॉलेज येथे आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न.!

 



सारा न्यूज नेटवर्क - 

चंद्रभागाबाई यलगुलवार  प्रशाला व ज्युनिअर कॉलेज येथे आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न.!


सोलापूर (प्रतिनिधी) : - नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड जिल्हा शाखा सोलापूर संचलित चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व ज्युनिअर कॉलेज,चंद्रभागाबाई यलगुलवार प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न झाला. भारतीय संस्कृतीत अडीच हजार वर्षापासून योगाविषयीची जागरूकता विशद केलेली आहे.अखिल विश्वाला योगा कडे वळवण्याचे काम भारताने केले आहे. शरीर व मन यांच्या शुद्धीसाठी योगाची नितांत आवश्यकता आहे आणि ती 365 दिवस केली पाहिजे,या हेतूने जागतिक स्तरावर योग दिन सुरू करण्यात भारताने पुढाकार घेतला व जगाने तो मान्य केला. 



याप्रसंगी यलगुलवार प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या व नॅब सोलापूरच्या सह सेक्रेटरी सौ.सीमा श्रीगोंदेकर- यलगुलवार यांची प्रमुख उपस्थिती होती, तर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संतोष माशाळे व पर्यवेक्षक डॉ.बंडोपंत पाटील हे याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते. स्वामी विवेकानंद केंद्राच्या ऐश्वर्या राजमाने,सुप्रियाताई व संस्कार भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी योग शिक्षणाचे धडे घेतले. 


          प्रारंभी प्रा.जोतिबा काटे यांनी प्रास्ताविक केले व आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून रोजी सुरू होण्यामागे असलेला हेतू आपल्या प्रास्ताविकात स्पष्ट केला. मानवी जीवनाच्या उत्थानासाठी व प्रगतीसाठी सुदृढ शरीर व सुदृढ मनाची आवश्यकता असते, ते योगातून सहज साध्य होते या हेतूने जागतिक स्तरावर सुरू झालेला योग दिन आज अत्यंत उत्साही वातावरणात नॅब शिक्षण संकुलात पार पडला.     

शेवटी कु.आरती बेंजरपे मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी प्राथमिक शाळा,प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमधील सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.


सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment