Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, June 5, 2025

सोलापूर येथे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, आयोजित "माहिती अधिकार कार्यकर्ता कार्यशाळा २०२५" संपन्न.

 


सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर येथे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ,  आयोजित "माहिती अधिकार कार्यकर्ता कार्यशाळा २०२५" संपन्न.

सोलापूर (प्रतिनिधी) :-दि. ०३.०६.२०२५ रोजी जुने जिल्हाधिकारी कार्यालय बहुद्देशीय सभागृह, सोलापूर येथे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, मा. श्री. सुभाषजी बसवेकर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख अतिथी मा. श्री. अविनाशजी मोकाशी, निवृत्त सीबीआय अधिकारी, श्री संजय किणीकर, प. महाराष्ट्र अध्यक्ष, श्री योगेश सुळे, जिल्हा अध्यक्ष, श्री श्रीकांत कोळी, शहर अध्यक्ष, डॉ. सत्यजित म्हस्के, प. महाराष्ट्र संघटक, श्री मारुती जाधव, कार्यकारी प्रचारप्रमुख, श्री दत्ता पवार, जिल्हा सह संघटक, श्रीमती वैशाली हावणुर, महिला जिल्हा उपाध्यक्ष तसेच माताजी बिल्ला यांच्या व जील्हयातील महासंघाचे सर्व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत माहिती अधिकार कार्यकर्ता कार्यशाळा २०२५ मोठ्या उत्स्फूर्त प्रतिसादाने संपन्न झाली.


सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ गुलाबपुष्प व सोलापुरी चादर देवुन सत्कार करण्यात आले. 

त्यानंतर लगेच मा. श्री. अविनाश मोकाशी सर यांच्या मानवाधिकार व माहिती अधिकार या विषयाने पहिल्या सत्राची सुरुवात झाली. त्यामध्ये त्यांनी "मानवी अधिकारांचा जागतिक जाहीरनामा" युनिव्हर्सल डिक्लारेशन ऑफ ह्यूमन राईट्स या पुस्तकातील ३० कलमांचे महत्त्व पटवून दिले. तसेच सेक्शन आठ खाली दिलेल्या माहिती व्यतिरिक्त कोणतीही माहिती नाकारता येत नाही व लोकसभेला नाकारलेली माहितीसुद्धा देणे बंधनकारक आहे असे प्रतिपादन केले. 


कॉमन सेन्स संपतो तेव्हा कायदा लागू होतो तसेच जन सामान्यांच्या शरीर व संपत्ती चे संरक्षण करणे हे पोलिसांचे कार्य असते असे मत त्यांनी मांडले. 

उत्तरीय भाषणात त्यांनी मानवाधिकार याविषयी माहिती सांगितली. 

दुपारच्या सुट्टी अगोदर उपस्थित महासंघाचे महिला व पुरुष कार्यकर्ते यांच्या काही समस्या व त्यावरील उपाय याकरिता विचारविनिमय झाला. 




त्यानंतर आयोजकांनी उपस्थितांसाठी उत्तम प्रकारे जेवणाची व्यवस्था केली होती. 

जेवणानंतर दुपारच्या सत्रात संस्थापक अध्यक्ष, श्री सुभाषजी बसवेकर सर यांनी एका गाण्याने सुरुवात करून सर्वांना माहितीचा अधिकार वाघाप्रमाने न घाबरता कसा वापरायचा याविषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच नवीन कार्यकर्ता नोंदणी १५ जून पर्यन्त मुदत असून जास्तीत जास्त नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पिंपरी चिंचवड, पुणे येथील श्री केवट यांनी देखील मोलाचे मार्गदर्शन केले. 

बिबी दारफळ येथील अश्याच एका कार्यकर्त्याने कोंढारभागातील वाघाचा म्हणजे कै. बशीर जहागीरदार, टेंभुर्णी यांचा नामोल्लेख करून त्यांनी केलेली मदत व त्यांच्या कार्याची सर्वाँना आठवण करून दिली. 

त्यानंतर आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment