सारा न्यूज नेटवर्क -
मध्य रेल्वे महिला कल्याण संघ (CRWWO) कडून वाडीबंदर येथे वृक्षारोपण आणि झोपडपट्टीतील महिलांना पर्यावरणपूरक सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप.
मुंबई (प्रतिनिधी) :- मध्य रेल्वे महिला कल्याण संघाने (CRWWO) पर्यावरण संवर्धन व सौंदर्यीकरणासाठी आणखी एक पाऊल उचलत वाडीबंदर, मुंबई येथील इंटीग्रेटेड कोचिंग कॉम्प्लेक्समध्ये २० जून २०२५ रोजी वृक्षारोपण मोहीम आयोजित केली.
या कार्यक्रमात CRWWOच्या अध्यक्षा सौ. आशा मीणा यांनी उपस्थित राहून पर्यावरण संरक्षणासाठी आपला पाठिंबा दर्शविला व समाजासाठी आदर्श घालून दिला.
या वेळी अशोक, अर्जुन, सदाड, काजू, प्लुमेरिया रुब्रा, पेरू इत्यादी प्रकारांची झाडे लावण्यात आली.
अध्यक्ष सौ. आशा मीणा यांनी परिसरातील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या महिलांना पर्यावरणपूरक ‘दस्तक’ सॅनिटरी नॅपकिन्स वाटले व त्यांना स्वच्छता आणि वैयक्तिक आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले.
रेल्वे महिला कल्याण केंद्रीय संघटना (RWWCO), रेल्वे बोर्ड यांच्यातर्फे सुरू करण्यात आलेल्या “दस्तक” या उपक्रमाअंतर्गत गरजू महिलांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स मोफत वाटले जातात आणि महिलांच्या व्यक्तिगत आरोग्याविषयी जागरूकता निर्माण केली जाते.
या प्रसंगी सौ. प्रेरणा गोस्वामी (उपाध्यक्ष), सौ. बबिता पांडे (सचिव), सौ. टीना उप्पल (कोषाध्यक्ष) व इतर अनेक कार्यकारी सदस्य उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment