Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, June 27, 2025

चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये डॉ. हेलन केलर यांची जयंती साजरी..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये डॉ. हेलन केलर यांची जयंती साजरी..


सोलापूर (प्रतिनिधी) :- नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड जिल्हा शाखा सोलापूर संचलित चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व ज्युनिअर कॉलेज मध्ये डॉ. हेलन केलर यांची जयंती उत्साहात संपन्न झाली. 

            याप्रसंगी चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या सीमा श्रीगोंदेकर- यलगुलवार, पर्यवेक्षक डॉ.बंडोपंत पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. 


        प्रारंभी प्रा.जोतिबा काटे यांनी डॉ. हेलन केलर यांच्या कार्याविषयी व त्यांनी केलेल्या जीवनातील संघर्षा विषयीची माहिती आपल्या प्रास्ताविकात दिली. आपल्या बहिरेपणावर व अंधत्वावर मात करत हेलन केलर यांनी जगभरातील  अंध अपंगांना शिक्षणाची द्वारे खुली केली. आज जगभरात त्यांनी निर्माण केलेल्या ब्रेल लिपीच्या साह्याने दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याप्रसंगी मेघना माढेकर, रक्षता शिंदे व निकिता फटे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अंध अपंगांच्या जीवनात अद्वितीय कामगिरी करणाऱ्या डॉ.हेलन केलर यांच्या जयंतीनिमित्त नॅब परिवाराने हेलन केलर यांच्या विषयीची कृतज्ञता व्यक्त केली.

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ज्युनिअर कॉलेजच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. जोतिबा काटे यांनी केले.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment