Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, June 1, 2025

धक्कादायक : पत्नी कामावर निघताच पतीचा शारीरिक संबंधासाठी आग्रह ; नकार देताच पत्नीला जाळलै..


 सारा न्यूज नेटवर्क - 

धक्कादायक : पत्नी कामावर निघताच पतीचा शारीरिक संबंधासाठी आग्रह ;

नकार देताच पत्नीला जाळलै.. 


मुंबई (प्रतिनिधी) :- चेंबूरमधील वाशी नाका येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर पत्नीला जाळून मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेने चेंबूरमध्ये खळबळ उडाली असून, परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पीडित महिला 38 वर्षांची असून, ती तिच्या पतीसोबत चेंबूरमधील वाशीनाका येथे राहते. काल ती सकाळी उठली आणि कामावर जाण्यासाठी तयार होत होती. पण, याच दरम्यान तिच्या पतीने शरीरसुखाची मागणी केली. मात्र, महिलेने पत्नीने कामाला जायचे आहे, असे म्हणत शरीर संबंधास नकार दिला.

पत्नीचा नकार ऐकून पती संतापला आणि रागाच्या भरात त्याने घरातून रॉकेलचा कॅन उचलला आणि तो पत्नीवर ओतला. त्यानंतर त्याने तिला पेटवून दिले. आगीने पेट घेतल्यानंतर महिलेने ओरडायला सुरुवात केली.

महिलेचा ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी आणि रस्त्यावरून जाणारे लोक तत्काळ घटनास्थळी पोहोचले. आग विझवण्याचा प्रयत्न करून, तिला उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल केले. सायन रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेत महिला 70 टक्क्यांहून अधिक भाजली आहे. सध्या तिची प्रकृती देखील गंभीर आहे.

या प्रकरणात कारवाई करताना, चेंबूर पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि घरगुती हिंसाचाराच्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने चेंबूर परिसरात खळबळ उडाली आहे.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment