Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, June 19, 2025

शंकरगाव, ता.पंढरपूर येथे जागतिक पितृदिन सम्पन्न.




सारा न्यूज नेटवर्क

 शंकरगाव, ता.पंढरपूर येथे जागतिक पितृदिन सम्पन्न.. 


पंढरपूर (प्रतिनिधी) :- जागतिक पितृदिनानिमित्त मौजे शंकरगाव, ता. पंढरपूर येथे ह.भ.प. कै. मनोहरबुवा धोंडीबा खाडे महाराज यांच्या स्मृत्यर्थ येथील खाडे परिवाराचे वतीने आयोजित सांप्रदायिक भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. याच कार्यक्रमात येथील निष्ठावान वारकरी ह.भ.प. बबन महाराज चंदनशिवे व त्यांच्या पत्नी सौ. छाया यांना ह.भ.प. मनोहरबुवा खाडे महाराज यांचे प्रथम वर्षश्राद्धानिमित्तच्या स्मृतिप्रित्यर्य संपूर्ण कपडे, भांडी, छञी, पादत्राणे, इ. वस्तू भेट देऊन, या पंचक्रोशीतील आदर्शवृत सांप्रदायिक परंपरेला समाजाभिमुख करणारा उपक्रम करण्यात आला.

या उपक्रमात अण्णासो पाटील, भगवान पांढरे, सुभाष बोचरे, शिवदास कुंभार, विश्वनाथ बाबर, काकासो महामुनी, सत्यवान खरात, कानिफनाथ शिंदे, दाजी वाघ, चंदू पांढरे, श्रीकृष्ण पांढरे, रोहिदास कांबळे, हरिदास कुंभार, विलास अतकरे, अण्णासो पांढरे, बाळासो धनवे, आदि वारकरी भक्तांनी आपली संप्रदायिक भजनसेवा टाळ-मृदंगाच्या गजरात रुजू केली. या कार्यक्रमास खाडे परिवारातील श्रीमती नागरबाई, श्री. रमेश, सौ. रेखा, श्री. प्रकाश, श्रीमती मैनाबाई शिखरे, श्री.संजय घोडके, सौ.संगीता गेजगे यांचेसह, सरपंच संजय कोळी, ग्रामसेवक समाधान कांबळे, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी सतीष शिंदे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विठ्ठल कांबळे, परशुराम राजगुरु तसेच, पंचक्रोशितील स्त्री-पुरूष हजर होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी येथील मारुती आठवले, छबा जाधव, पबा आठवले, चंद्रा आठवले आदींनी परिश्रम घेतले.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment