सारा न्यूज नेटवर्क -
ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय हॅकाथॉन स्पर्धा संपन्न..
सोलापूर (प्रतिनिधी) : - ए. जी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये १४ व १५ जून रोजी 'एजी टेकॅथॉन १.०' ही दोन दिवसीय राष्ट्रीय हॅकाथॉन स्पर्धा पार पडली. देशभरातील ७० हून अधिक संघांनी यात सहभाग घेतला. एआय, सायबर सुरक्षा, कृषी, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या क्षेत्रांतील समस्यांवर नावीन्यपूर्ण डिजिटल उपाय शोधणे हे या स्पर्धेचे उद्दिष्ट होते. संस्थेचे चेअरमन एस. ए. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धेचे उद्घाटन झाले.
त्यांनी विद्यार्थ्यांना स्टार्टअप संस्कृती आणि उद्योजकतेसाठी प्रोत्साहित केले. संगणक विभागाच्या कोड क्लबने आयोजित केलेल्या या स्पर्धेत वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 'क्युर-कनेकट' संघाने प्रथम, ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 'कोड-नीती' संघाने द्वितीय, तर सिम्बायोसिस कॉलेज, पुणे येथील 'डाटा-विझार्ड' संघाने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना रोख पारितोषिके, ट्रॉफी आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. निवडक प्रोजेक्ट्सना पुढील स्टार्टअप आणि इन्क्युबेशनसाठी संधी मिळणार आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment