Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, June 21, 2025

शासकीय मैदान, सोलापूर येथे जागतिक योग दिन साजरा..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

📍 शासकीय मैदान, सोलापूर येथे जागतिक योग दिन साजरा.. 

सोलापूर (प्रतिनिधी) :- आज जागतिक योग दिनाच्या निमित्ताने सोलापूर शहरातील शासकीय मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात  मा.आमदार सुभाष बापू देशमुख,सहभागी झाले. 



तसेच, उपस्थित नागरिकांना योग केल्याने शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी होणारे फायदे पटवून दिले. तसेच, जागतिक योग दिन हा केवळ एका दिवसापुरता साजरा न करता दररोज एक तास योग साधना करून तो खऱ्या अर्थाने साजरा करावा, असे आवाहन याप्रसंगी केले.







यावेळी शहराध्यक्ष सौ. रोहिणी ताई तडवळकर, भाजप प्रदेश संघटक श्री. रघुनाथ कुलकर्णी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री. मनीषभैय्या देशमुख, पतंजलीचे राज्य प्रभारी सौ. सुधाताई अळीमोरे, श्री. महेश देवकर, श्री. दीपक जमादार, सुजाताताई सुतार, संगीताताई जाधव, श्री. नामदेव पवार तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 




No comments:

Post a Comment