Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, June 28, 2025

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

सातारा येथील माता भीमाई आंबेडकर स्मारक  वाढीव ६ गुंठे जागा उपलब्ध करुन देण्यात येणार - अंबादास शिंदे 


सातारा (प्रतिनिधी) :-सातारा येथील माता भीमाई आंबेडकर स्मारक प्रकरणी सद्या असलेली ११ गुंठे जागा आहे त्यावर स्मारकासाठी फाउंडेशन बांधले आहे यासाठी सुमारे ९० लाख रुपये खर्च केल्याचे सांगितले जात आहे खरं काय ट्रस्ट पदाधिकारी यांनाच माहीत असते याबाबत आंबेडकरी जनतेला वर्गणीदाराला मीटिंग घेऊन कधीच सांगितले नाही भोवताली असलेली जागेवर अतिक्रमण करून बांधकाम केले आहे असाच प्रस्ताव सातारा नगरपालिकेला सादर करण्यात आला म्हणून बांधकाम विभागाने मंजुरी दिली नाही म्हणून काम प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे आता अतिक्रमण केलेली ६ गुंठे शेजारील जागा मिळावी म्हणून ट्रस्टनी मा सहाय्यक आयुक्त सामाजिक कार्यालय सातारा यांना अर्ज केला असून त्यांनी मा तहसीलदार सातारा पुढील कारवाई साठी पाठविला आहे सदर प्रकरणात संबंधित अधिकारी यांचेकडून संमती व माहिती मागितली आहे त्यानंतर वाढीव जागा मिळाल्यानंतर बांधकाम सुरू होईल असे सांगत आहेत या सर्व प्रकारच्या हालचालींवर पँथर्स लक्ष ठेवून आहेत ना शंभूराज देसाई पालक मंत्री आढावा घेत आहेत अशी माहिती मा श्री जाधव सो सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी सातारा यांनी देत आहेत ते कर्तव्य दक्ष अधिकारी आहेत ते वारंवार विचारलेली माहिती देत आहेत ही सर्व परिस्थिती पाहता ट्रस्टचा गैरकारभार ; गैरव्यहर ; ट्रस्ट मधील वाद ; अतिक्रमण व भीमाई अस्थींचे कराडला हस्तांतर केले ही सर्व कारणामुळे प्रशासक नियुक्त होऊ शकतो याबाबत प्राचार्य अरुण गाडे यांनी केलेली मागणी बरोबर आहे यासाठी पब्लिक ट्रस्ट कायदा कलम ४१ ड प्रमाणे प्रशासक नेमणूक करण्यात यावा अशी मागणी सातारा येथील धर्मदाय आयुक्त यांचेकडे विनंती अर्ज कोणीही व्यक्ती करू शकते ; उपोषण करू शकतात तरच स्मारक लवकर मार्गी लागेल यासाठी आंबेडकरी जनता व पँथर्स मिळून पाठपुरावा करीत आहेत.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment