सारा न्यूज नेटवर्क -
इको नेचर क्लब च्या माध्यमातून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध ठिकाणी वृक्षारोपण..
सोलापूर (प्रतिनिधि) :- गेली अनेक वर्ष वृक्ष लागवड व संवर्धन चळवळीत अग्रेसर असलेल्या इको नेचर क्लब ने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही सोलापूर शहरातील प्रत्येक प्रभागांमध्ये मोकळ्या परिसरात वृक्ष लागवड करण्यास सुरुवात केली आहे . वर्षभर संवर्धनाची जबाबदारी घेतली आहे . सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवातीस सकाळी लिटल फ्लावर स्कूल येथील परिसरात वृक्ष लागवड सुरुवात करून क्रीडा संकुल येथील लॉन टेनिस परिसर. न्यायाधीश निवास स्थान.
आरोग्य विभाग. अशोक चौक परिसर,स्वामी विवेकानंद नगर परिसर सैफुल परिसर, जुळे सोलापूर ,विजापूर रोड परिसर , सोरेगाव, एस आर पी कॅम्प पोलीस बल गट क्रमांक 10 -जिल्हा परिषद शाळा. अशा अनेक विविध ठिकाणी आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले उपस्थितीत जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर ,इको नेचर क्लबचे मुख्य प्रवर्तक व पर्यावरण दूत डॉ. मनोज देवकर , महाराष्ट्र लॉन टेनिस असोसिएशन सोलापूर अध्यक्ष व वन विभागाचे अधिकारी आंतरराष्ट्रीय खेळाडू सौ.संध्याराणी बंडगर , पर्यावरण प्रेमी रेश्मा माने, डॉ बलदवा. मुख्याध्यापक प्रदीप कलकामकर, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार ,नूतन क्रीडा अधिकारी मयुरी पवार ,तालुका क्रीडा अधिकारी माधुरी गावडे, रिमा पवार, पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे, पर्यावरण व्यवस्थापक स्वप्निल सोलंकर, उद्यानाधिक्षक किरण जगदाळे, निसर्ग देवकर उज्वला देवकर आदर्श धडे, शशिकला कुलकर्णी,आदी उपस्थित वृक्ष लागवड करण्यात आली.
व सर्व देशी व औषधी वृक्ष लावण्यात आले .तसेच सोलापुरातील माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत सर्व इको नेचर क्लबचे पर्यावरण प्रेमी यांनी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment