Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, June 22, 2025

मी सोलापूर माझे सोलापूर" समितीच्या वतीने विडी कामगार पाल्यांनाच शालेय साहित्याच्या वाटप..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

"मी सोलापूर माझे सोलापूर" समितीच्या वतीने विडी कामगार पाल्यांनाच शालेय साहित्याच्या वाटप.. 

    सोलापूर (प्रतिनिधी) :- सो.दि.22/6/25 :- मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने गरीब विडी व यंत्रमाग कामगारांच्या पाल्यांना शालेय साहित्य वाटप विष्णू कारमपुरी ?(महाराज) यांच्या अध्यक्षतेखाली व श्रीनिवास चिलवेरी यांच्या शुभहस्ते व विठ्ठल कुराडकर , प्रसाद जगताप , रेखा अडकी , सिकंदर शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

    मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने गरीब बिडी व यंत्रमाग कुटुंबियांच्या पाल्यांना शालेय साहित्य वाटप कामगार सेना कार्यालय पद्मशाली चौक येथे वरील मान्यवरांच्या हस्ते व उपस्थितीत करण्यात आले प्रारंभी श्री सरस्वती मातेचे पूजन व शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर समितीचे अध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) श्रीनिवास चिलवेरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यानंतर विद्यार्थी विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

         विद्यार्थी व विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटपासाठी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री सचिन जगताप सर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री कादर शेख सर दानशूर व उद्योगपती महादेव कोंगनूर कामगार नेते सायबण्णा तेगेळ्ळी अजिंक्य पवार यांनी विशेष सहकार्य केले. 

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल कुराडकर यांनी केले तर सूत्रसंचालन रेखा आडकी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीनिवास बोगा गुरुनाथ कोळी , पप्पू शेख , शरणप्पा जंगले , व मी सोलापूर माझे सोलापूर समितीचे पदाधिकारी विशेष परिश्रम घेतले. यावेळी 174 विद्यार्थी मुला मुलींना वह्याचे व शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 





No comments:

Post a Comment