Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, June 17, 2025

सेवा करिअरच्या महाकुंभात शेकडो विद्यार्थी सहभागी व्हावे ;


सारा न्यूज नेटवर्क -

सेवा करिअरच्या महाकुंभात शेकडो विद्यार्थी सहभागी व्हावे ;

माजी सहाय्यक आयुक्त श्री. प्रकाश राठोड यांचे आवाहन...


सोलापूर (प्रतिनिधी) :- येत्या शनिवार दि.२१ जून २०२५ रोजी सोलापुरातील नेहरू नगर येथे सेवा करिअरचा महाकुंभ पार पडणार असुन. हे कुंभ माजी सहाय्यक आयुक्त तथा सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री.प्रकाश राठोड यांनी आयोजित केला आहे. या महाकुंभात शेकडो विद्यार्थी सहभागी होणार असून यंदा उत्तीर्ण झालेल्या दहावी बारावी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि विद्यार्थी करिअर मार्गदर्शन पार पडणार आहे.

                 या कार्यक्रमाचे उद्घाटन धर्मगुरु प.पू.बाबुसिंग महाराज, पोहरागड यांच्या पूज्यहस्ते पार पडणार आहे. यावेळी उपस्थिती म्हणून पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे, आमदार सुभाष बापू देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधीचे कक्ष प्रमुख श्री.रामेश्वर नाईक, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, भाजपा शहराध्यक्षा सौ. रोहिणी तडवळकर, भाजपा महामंत्री श्री.पंडित राठोड हे असणार आहे.

                 त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि प्रेरणा देण्याकरिता सोलापूरचे जिल्हाधिकारी श्री. कुमार आशीर्वाद, मनपा आयुक्त सचिन ओंबासे, पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, महाराष्ट्र शिक्षण परिषदेचे उपायुक्त संजय राठोड आणि क्राईम ब्रँच पोलीस उपायुक्त डॉ.दिपाली काळे यांच्यासह परिसरातील शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित राहणार आहेत. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या करिअर महाकुंभात सहभागी होऊन मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन माजी सहाय्यक आयुक्त तथा सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री प्रकाश राठोड यांनी केले आहे.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment