सारा न्यूज नेटवर्क -
नाना जानकर यांची जनक्रांती युवा पत्रकार व पत्रकारेतर कर्मचारी संघ शहरअध्यक्ष पदी निवड..
सोलापूर (प्रतिनिधी) :- जनक्रांती युवा पत्रकार व पत्रकारेतर कर्मचारी संघ व्यवस्थापकीय संपादक शहराध्यक्षपदी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उपशहर प्रमुख श्री पांडुरंग उर्फ नाना जानकर यांची निवड करण्यात आली.
गेल्या 14 वर्षापासून दैनिक अब तक समूह मध्ये आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून प्रशासन दरबारात आवाज उठवत अविरपणे वृत्तसंकलन, वृत्तपत्र क्षेत्रात अनेक छोटे मोठे कार्यक्रम राबवित क्षत्रिय कुलवंतास प्रतिष्ठान संचलित जनक्रांती पत्रकार संघाद्वारे व इतर विविध सामाजिक उद्देश पूर्ण केले.
आपल्या तडफदार नेतृत्वाने आणि अभ्यासपूर्ण कार्यपद्धतीने नाना जानकर यांनी संघटनेच्या वाटचालीला नेहमीच नवा आयाम दिला आहे. अन्यायाविरोधात आवाज उठवताना, वंचितांच्या हक्कासाठी लढताना आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडताना त्यांनी नेहमीच सत्याची बाजू घेतली. कायद्याचे सखोल ज्ञान आणि समाजभान यांच्या जोरावर त्यांनी अन्यायाविरुद्ध लढाई केली आहे.
नाना जानकर यांची ही निवड म्हणजे त्यांच्या निष्ठेची आणि कार्यक्षमतेची पावती आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित, शोषित आणि अन्यायग्रस्त घटकांचा आवाज आता अधिक बुलंद होणार आहे. त्यांची लेखणी ही आता केवळ बातमी देणारी नव्हे, तर अन्यायाच्या विरोधात लढा उभारणारी आणि सत्याला न्याय मिळवून देणारी ठरणार आहे.
ही निवड म्हणजे संघटनेच्या विचारधारेचा विजय आहे. सत्य, समता आणि न्यायासाठी लढणाऱ्या या प्रवासात नाना जानकर यांचे योगदान आता आणखी मोठ्या व्यासपीठावरून दिसेल, याचा सार्थ अभिमान संघटनेला आहे.
ही निवड झाल्याने नाना जानकर यांचे सर्वत्र अभिनंदन व शुभेच्छांचे वर्षाव दिसून येत आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment