Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, June 26, 2025

चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी..


सारा न्यूज नेटवर्क - 

 चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी..


सोलापूर (प्रतिनिधी) :- सामाजिक क्रांतीचे प्रणेते,महाराष्ट्रातील अग्रगण्य समाज सुधारक,लोकनेते,राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस नॅब संचलित चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व ज्युनिअर कॉलेज मध्ये उत्साहात संपन्न झाला. 

            याप्रसंगी संस्थेचे जनरल सेक्रेटरी शशीभूषण यलगुलवार,सह-सेक्रेटरी शिवाजी जाधव, माजी प्राचार्य नरसिंह आसादे, चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या सीमा श्रीगोंदेकर- यलगुलवार, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. 

            याप्रसंगी डॉ.बंडोपंत पाटील यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांविषयी  व त्यांच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. पुरोगामी महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात पहिला समाजसेवक राजा  आणि समाज सुधारक राजा कोण असेल, तर शाहू महाराज होते. शाहू महाराजांनी दीनदलित व वंचितांच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले,त्याचबरोबर व्यक्तीच्या गरजेतून निर्माण झालेली वसतिगृहे सुद्धा कोल्हापूर संस्थानात स्थापन केली. राधानगरी धरण हे शाहू महाराजांनी दिलेले खूप मोठे वरदान आजतागायत ठरत आहे‌. असे गौरवोद्गार बंडोपल बंडोपंत पाटील यांनी काढले.

           या कार्यक्रमास प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षक वृंद व विद्यार्थी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता. ‌

           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख कु.आरती बेंजरपे यांनी केले, तर श्री.कासीम मुजावर सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे






No comments:

Post a Comment