सारा न्यूज नेटवर्क -
🌱 वृक्षारोपण कार्यक्रम – सह्याद्री फाउंडेशन, पोलीस विभाग व आय.आर.बी. यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न 🌱
उळे (ता. सोलापूर),(प्रतिनिधी) :- दि. २१ जून:सोलापूर–तुळजापूर महामार्गालगत उळे येथे सह्याद्री फाउंडेशन, सोलापूर ग्रामीण पोलीस व (IRB) यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला सोलापूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मा. अतुल कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष व उळेचे उपसरपंच श्री. नेताजी (भाऊ) खंडागळे,सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. मनोज अभंग,
पीएसआय महेश घोडके,पीएसआय गंपुले मॅडम, IRB प्रतिनिधी झजेरिया व कुलकर्णी,श्री. दत्ता डांगे,श्री. राम चौगुले,
सह उळे पंचक्रोशीतील पोलीस पाटील, नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाचे उद्दिष्ट पर्यावरण संरक्षणाबरोबरच स्थानिक नागरिकांमध्ये सामाजिक वनीकरणाची जाणीव निर्माण करणे हे होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सह्याद्री फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल सर्व मान्यवरांनी समाधान व्यक्त केले आणि भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवावेत, असे आवाहन करण्यात आले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment