सारा न्यूज नेटवर्क -
आमदार सुभाष देशमुख यांनी मतदारसंघातील समस्यांचा केला पाठपुरावा ;
महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांची धडक कृती ..
सोलापूर (प्रतिनिधी) :- लोकप्रिय आमदार सुभाषबापू देशमुख साहेबांनी महापालिका आयुक्त सचिनजी ओबांसे साहेब यांच्याकडे दक्षिण विधानसभेतील अनेक उपक्रमांबाबत समस्या व्यक्त केल्या. याची दखल घेत आज आयुक्तानी संबंधित अधिकाऱ्यां सॊबत पाहणी दौरा करत सूचना केल्या.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तालावाची पाहणी करत गाळ, स्वच्छतेबाबत सूचना केल्या. विजापूर रोड परिसरात नाट्यगृह असावे या नागरिकांच्या मागणीचा आदर करत आमदार बापूसाहेबांनी पाठपुरावा केलाय. त्यानुसार आज अशोक नगरकडून सुंदरम नगर च्या रस्त्यावरील पाण्याच्या टाकी शेजारची जागा पाहत नाट्यगृहाच्या उभारणी आरखड्या बाबत सूचना केल्या.
खेळाडूंच्या हितासाठी जलतरण तलाव आवश्यक आहे. याबाबत बापूना अनेक क्रीडाप्रेमीनी विनंती केली. या बाबत आय टी आय च्या पाठीमागील जलतरण तलावाची पाहणी करत लवकर सुरु होण्यासाठी योग्य त्या सूचना दिल्या. जुळे सोलापूरच्या जीवनवाहिनी मध्ये अत्यंत महत्वाचा आसारा पुलाच्या कामाचा आढावा घेताना काम गतीने करण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या.
जनहितासाठी आमदार सुभाषबापू देशमुख साहेबांनी मांडलेल्या मुद्यावर आयुक्तानी पाहणी करत मार्ग काढत आहेत he पाहून नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी महेश देवकर भाजप दक्षिण पश्चिम मंडल अध्यक्ष, भाजप सरचिटणीस विशाल गायकवाड, अनुप कुलकर्णी, किरण शिंदे यांची उपस्थिती होती.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment