Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, June 26, 2025

स्वामी विवेकानंद प्रशालेमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

स्वामी विवेकानंद प्रशालेमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी.. 


 सोलापूर(प्रतिनिधी) : - एमआयडीसी भागातील *स्वामी विवेकानंद प्रशालेमध्ये* आज गुरुवार दि. 26 जून 2025 रोजी *राजर्षी छत्रपती शाहू महाराज* यांची *जयंती* उत्साहात साजरी करण्यात आली....

 प्रारंभ प्रशालेचे मुख्याध्यापक *मा.डॉ.हणमंत नारायणकर* यांच्या शुभहस्ते *राजर्षी छत्रपती शाहू महाराज* यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

यानंतर प्रशालेतील विद्यार्थ्यांची भाषणे झाली यामध्ये *चि.ओमकार कांबळे, कु. विद्या कोतलापुरे, चि.शुभम नामाजी, कु.सायली भुरे, चि.अरविंद नल्ला, चि.आदित्य जाधव* यांनी भाषणे केली...



यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रशालेतील सहशिक्षक *मा.सुभाष माने* यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी मनोगतात छत्रपती शाहू महाराज यांनी अस्पृश्यता, जातीभेद दूर करून समाजामध्ये मानवता हाच धर्म प्रस्थापित केला. त्याचबरोबर आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार केला. जेणेकरून समाजामध्ये सर्व वर्गांमध्ये एकीची भावना निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले...


 *अध्यक्षीय भाषणात मा.डॉ.हणमंत नारायणकर सर* यांनी तत्कालीन समाजामध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचे योगदान अतुलनीय आहे, असे सांगितले...

 त्यावेळी शाहू महाराजांनी समाजातील विविध जातीव्यवस्थेतील लोकांसाठी विशेष शाळा व वसतीगृहाची निर्मिती करून ज्ञानाची दारे सर्वांसाठी खुले केल्याचे सांगितले...

 या कार्यक्रमात प्रशालेतील सहशिक्षक *मा.सपताळे सर, मा.कोळी सर, मा.शिंदे सर, मा.हिंगमिरे मॅडम, मा.निलंगीकर मॅडम* आदी उपस्थित होते...

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील विद्यार्थिनी *कु.श्रावणी कोळी* हिने केले तर आभार *कु.सुप्रिया कोळी* हिने मानले...

 यावेळेस प्रशालेतील विद्यार्थीवर्ग व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग उपस्थित होता...

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment