Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, June 16, 2025

दारफळ गावडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोलापूर येथे प्रवेशोत्सव उत्साहात साजरा..



सारा न्यूज नेटवर्क - 

दारफळ गावडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोलापूर येथे प्रवेशोत्सव उत्साहात साजरा..


सोलापूर (प्रतिनिधी) :- दारफळ गावडी मध्ये आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा पहिला दिवस या निमित्ताने प्रभात फेरी काढण्यात आली . यामध्ये घोड्यावरती  सावित्राबाई च्या लेखी बसवण्यात आल्या, हलगीच्या तालावर तसेच ट्रॅक्टरमध्ये  लहान मुलांना बसवून पूर्ण गावात फटाक्यांच्या आवाजा प्रभात फेरी करण्यात आली. यावेळी पूर्ण पालक वर्ग, लहान मोठी मुले मुली, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 



             विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे क्षण दिसत होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मध्ये विद्यार्थ्यांना दोन ड्रेस, दोन बूट, पुस्तके, तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी गावडी दारफळ  मधील उपसरपंच कल्याणराव काळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक घुमरे सर, पाटील सर, शिंदे सर, गवळी मॅडम, अवताडे मॅडम, काशीद मॅडम, भोसले मॅडम, अंगणवाडी सेविका उंबरे मॅडम,लांडगे मॅडम, शालेय शिक्षण समितीच्या उपाध्यक्ष श्रीधर कदम, महेश पवार, कालीदास पवार, जगदीश माने, अमर राऊत तसेच आधी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment