Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, June 7, 2025

नोटरी करून पत्नीला तलाक ; पती,मौलानांसह 6 जणांवर गुन्हा दाखल..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

 नोटरी करून पत्नीला तलाक ;

 पती,मौलानांसह 6 जणांवर गुन्हा दाखल..


सोलापूर(प्रतिनिधी) :- सासरच्या मंडळींना नातवाचं लवकर तोंड पाहण्याची घाई आणि त्यातून 'लवकर मुल-बाळ पाहिजे' या कारणावरून सासरच्या मंडळींनी छळ करुन विवाहितेला नोटरी पध्दतीने तलाक दिला. ही घटना १६ मार्चपूर्वी घडली. या प्रकरणी दाखल फिर्यादीनुसार सलगर वस्ती पोलीस ठाण्यात मौलाना आणि सासरसह ०६ आरोपींविरुध्द गुन्हा दाखल झालाय.


याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, येथील वांगी रोड थोरली इराणवस्ती येथील रहिवासी सौ. शबनम सैफअली पठाण (वय-२२ वर्षे) या विवाहित तिच्या सासरची मंडळी आपल्याला लवकर मूलबाळ पाहिजे, असा तगादा लावून सासरी छळ करीत होते. हा छळ-वाद १८ जून २०२१ पासून १६ मार्च २०२५ दरम्यान सुरु होता.


वरील नमूद कारणावरून तिच्यासोबत भांडण करून शिवीगाळ करून मानसिक व शारीरीक त्रास देणे सुरु होते, त्यातच १६ जानेवारी २०२४ रोजी तिच्या सासरकडील मंडळी व मौलाना महमद रमजनान फलाही आणि गरीब नवाज जमादार (दोघे, रा. हबु हनिमा मस्जिद, नं. २ झोडपट्टी सोलापूर) यांनी मिळून शबनम व तिच्या पतीचा नोटरी पध्दतीने बेकायदेशीर तलाक केला.


त्यावर लिमयेवाडी वांगी रोड, भैरू वस्ती येथे माहेरी वास्तव्यास असलेल्या शबनमने बुधवारी दुपारी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार सासू आफरीन, सासरे म. रफिक, पती सैफअली, दिर सुफियान (रा-२७२, थोरली ईरण्णा वस्ती, वांगी रोड, सोलापूर, मौलाना महमद रमजानन फलाही आणि गरीब नवाज जमादार यांच्याविरूध्द भा.न्या. सहिता कलम ८५, ३५२, ३५१ (२), ३ (५) सह मुस्लीम महिला विवाह का क ४ प्रमाणे सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सहाय्यक फौजदार चंगरपल्लु या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment