Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, June 29, 2025

श्री संत गजानन महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात भक्तिमय स्वागत ! आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, उपसरपंच नेताजी भाऊ खंडागळे यांची उपस्थिती..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

श्री संत गजानन महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात भक्तिमय स्वागत !

आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, उपसरपंच नेताजी भाऊ खंडागळे यांची उपस्थिती.. 

सोलापूर (प्रतिनिधी) :- शेगावहून पंढरपूरकडे निघालेल्या श्री संत गजानन महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन होताच, पहिला मुक्काम उळे (ता. दक्षिण सोलापूर) येथे मोठ्या श्रद्धा, भक्ती आणि उत्साहात झाला.


"साधू संत येते घरा, तोचि दिवाळी दसरा" या ओवीप्रमाणे उळेगाव भक्तीमय रंगले.


पालखीचे स्वागत आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, उपसरपंच नेताजी भाऊ खंडागळे, जिल्हा प्रशासन, उळे आणि पंचक्रोशीतील नागरिक यांच्या उपस्थितीत पार पडले.


ग्रामस्थांकडून राहण्याची व महाप्रसादाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली.

|| गण गण गणात बोते ||

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 





No comments:

Post a Comment