Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, June 27, 2025

लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनेलचा तिसरा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनेलचा तिसरा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.. 


छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि फाउंडेशनचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला 


📍 सोलापूर (प्रतिनिधी) :- लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनेलच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आणि थोर समाजसुधारक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून, समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.


हा भव्य कार्यक्रम २६ जून रोजी सकाळी ११ वाजता, डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह, सोलापूर येथे पार पडला .


कार्यक्रमात पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण, आरोग्य, क्रीडा, महिला सक्षमीकरण, पर्यावरण, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी निवडक मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.


 "राजर्षी शाहू महाराज यांनी समाजात समता, शिक्षण आणि न्यायाचा संदेश दिला. त्याच विचारांची प्रेरणा घेऊन समाजोपयोगी कार्य करणाऱ्यांचा गौरव करणे हे आमच्या चॅनेलचे सामाजिक दायित्व आहे. असल्याचे लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठीचे मुख्य संपादक संगप्पा कांबळे यांनी सांगितले.


या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, पुरस्कार विजेते, पत्रकार, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के, महावितरणचे कार्यकारी अभियंता महेश पाटील (चाचणी विभाग),माँ साहेब कॅब संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा वर्षा शिंदे पाटील, थिंक टँकचे प्रमुख तथा मिडिया अभ्यासक प्रा डॉ बाळासाहेब मागाडे,रामभाऊ दुधाळ (सोमपा कॉन्ट्रॅक्टर),उमाकांत राजगुरू, मिलिंद भिंगारे,माजी नगरसेविका छाया कांबळे,प्रार्थना फाउंडेशनचे प्रसाद मोहिते, इको नेचर क्लबचे मनोज देवकर, सारा न्यूजचे राम हुंडारे,समता न्यूजचे अनिकेत लोंढे, सोमपा झोनल अधिकारी नंदकुमार जगधाने, अंबादास शिंदे, सहदेव रणधरे,मुख्याध्यापिका सविता गायकवाड,चित्रकार सिद्धार्थ शिरसाट , मंजिरी पाटील, मकदुम आतार आदी प्रमुख मान्यवरांसह पत्रकार बांधव आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. 

 

 पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल व एक रोप देऊन सन्मान करण्यात आले.


पुरस्कार प्रदान करण्यात आलेल्या मान्यवरांची नावे पुढीलप्रमाणे :- 

🛑रत्नाकर लक्ष्मण तांदळे (सैनिक - वीर सेवा सन्मान)

🛑पंडित विठ्ठल साबा (आदर्श मुख्याध्यापक जि.प.प्राथ.शाळा)

🛑 इम्रान अब्दुल लतिफ शेख ( आदर्श शिक्षक जि.प.प्राथ.शाळा)

🛑 उद्धवराव रामचंद्र पाटील ( आदर्श शेतकरी)

🛑 कृष्णा सुनील माळवेकर ( आदर्श पत्रकार - सोशियल मिडिया)

🛑 प्रा. डॉ. तेजस्विनी रंगनाथ कांबळे ( उत्कृष्ट निवेदिका )

🛑 रविकांत रेवप्पा बनसोडे (आदर्श समाजसेवक युवा )

🛑वैशाली संतोष सुळ ( आदर्श उद्योजिका)

🛑 मनोहर सीताराम राठोड (अंधत्वावर मात करणारा आदर्श हिरो)

🛑 योगीराज सुरेश अरळीमार (दिव्यांग प्रतिभा सन्मान)

🛑 सुभाष श्रीपती माने ( आदर्श चालक एस.टी महामंडळ)

🛑आम्रपाली दादासाहेब लोखंडे ( आदर्श महिला वाहक - एस.टी महामंडळ)

🛑शांतप्पा सिद्राम सलगरे ( आदर्श बँक व्यवस्थापक)

🛑फारुक मकबूलसाब सय्यद (सायकल - चक्रसेवा सन्मान)

🛑 जयकुमार राजकुमार कांबळे ( आदर्श आरोग्य निरीक्षक)

🛑प्रमिला विशाल क्षीरसागर ( आदर्श अंगणवाडी मदतनीस)

🛑बोधीवृक्ष फाउंडेशन ( पर्यावरण संवर्धन प्रेमी )

🛑अमोल भजनदास मगर ( उत्कृष्ट ग्राम महसूल अधिकारी )

🛑अबोली वित्तेश गवळी ( उत्कृष्ट आरोग्य रक्षक सन्मान)

🛑जीवन नागनाथ गायकवाड ( मानवता सेवा गौरव पुरस्कार)

🛑कपिल रमेश गायकवाड ( आदर्श स्वच्छता वीर पुरस्कार)

🛑संगीता गणपती चौगुले ( आदर्श विद्युत वीरांगना पुरस्कार)

🛑डॉ. परवेज बशीर अहमद अतनुरकर ( वैद्यकीय सेवा - आयुर्वेद ) 

🛑मिनल रविकिरण दास (समाजसेवा महिला - नारीशक्ती सन्मान)

🛑नरेश विजयकुमार शिंदे समाजप्रबोधन - समाजरत्न


या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून आला. सर्वांनी ह्या कार्यक्रमाचे तोंड भरून कौतुक केले.


याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के, प्रा डॉ बाळासाहेब मागाडे, डॉ तेजस्विनी कांबळे, शांतप्पा सलगरे, नरेश शिंदे, उद्धवराव पाटील, पंडित साबा आदी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून चॅनेलला शुभेच्छा दिल्या.


    चॅनलचे मुख्य संपादक संगप्पा गौतम कांबळे यांनी चॅनलने आतापर्यंत केलेल्या कार्याचा थोडक्यात आढावा मांडला , सूत्र संचालन सुधाकर कसबे आणि मनिषा तुपसाखरे यांनी केले तर आभार प्रदर्शन उपसंपादक रमेश जाधव यांनी व्यक्त केले. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपसंपादक राहूल उडाणशिव,वृत्त संपादक अनिल वाले,अमोल वाघमारे, हरिष फडतरे,वैभव इंगळे,विशाल सुर्वे, किरण कांबळे,सुनिल मस्के, विनोद फडतरे, ऋषिकेश माळशिकारे,राहुल कांबळे आदींनी परिश्रम घेतले.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment