सारा न्यूज नेटवर्क -
जात पडताळणी कार्यालयात संभाजी ब्रिगेडचे ठिय्या आंदोलन.
सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर जात पडताळणी समिती कार्यालयाकडे गेल्या एक दोन वर्षापासुन हजारो जात पडताळणी प्रकरणे प्रलंबित आहेत त्याचा फटका विद्यार्थ्यांना व नागरिकांना बसत असून मराठा समाजातील अनेक विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी मुद्दामहून दिरंगाई केली जात असल्याचा आरोप करीत प्रशासनच्या ढिम्म कारभाराच्या विरोधात सोलापूर येथील जात पडताळणी कार्यालयात संभाजी ब्रिगेड च्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ अर्ज स्वीकारण्यासाठी दुसरे खिडकी तात्काळ उघडण्यात करण्यात आली. किया आंदोलनाच्या वेळी जात पडताळणी समितीच्या कार्यालयामध्ये कोणताच अधिकारी उपस्थित नव्हता त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयातच ठिय्या मारला यावेळी जात पडताळणी समितीचे उपाध्यक्ष रवींद्र कदम पाटील साहेब यांनी संभाजी ब्रिगेडशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून लवकरात लवकर युद्धपातळीवर जात प्रमाणपत्र पडताळणीचे कामे करू असं आश्वासन दिले.
सोलापूर समितीकडे शहर जिल्ह्यातील सुमारे साडेचार हजारहुन अधिक जात पडताळणीची प्रकरणे प्रलंबित आहेत गेल्या काही महिन्यापासून पूर्णवेळ अध्यक्ष मिळून देखील अनेक जात प्रमाणपत्र प्रलंबित आहेत या जात पडताळणी प्रमाणपत्र साठी गरजू विद्यार्थी सह नागरिक सतत कार्यालयात हेलपाटे मारत आहेत अनेक जण करमाळा माळशिरस सांगोल्यासारख्या दूरवरच्या तालुक्यातून व काहीजण पर जिल्ह्यातून या कार्यालयात सारखे हेलपाटीमारत आहेत त्यांना त्याच्या मानसिक व आर्थिक फटका सहन करावा लागत आहे
सोलापूर जात पडताळणी समिती कार्यालयाकडे गेल्या एक दोन वर्षापासुन हजारो जात पडताळणी प्रकरणे प्रलंबित आहेत त्याचा फटका विद्यार्थ्यांना व नागरिकांना बसत असून मराठा समाजातील अनेक विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी मुद्दामहून दिरंगाई केली जात असल्याचा आरोप करीत प्रशासनच्या ढिम्म कारभाराच्या विरोधात सोलापूर येथील जात पडताळणी कार्यालयात संभाजी ब्रिगेड च्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.
सोलापूर समितीकडे शहर जिल्ह्यातील सुमारे साडेचार हजारहुन अधिक जात पडताळणीची प्रकरणे प्रलंबित आहेत गेल्या काही महिन्यापासून पूर्णवेळ अध्यक्ष मिळून देखील अनेक जात प्रमाणपत्र प्रलंबित आहेत या जात पडताळणी प्रमाणपत्र साठी गरजू विद्यार्थी सह नागरिक सतत कार्यालयात हेलपाटे मारत आहेत अनेक जण करमाळा माळशिरस सांगोल्यासारख्या दूरवरच्या तालुक्यातून व काहीजण पर जिल्ह्यातून या कार्यालयात सारखे हेलपाटीमारत आहेत त्यांना त्याच्या मानसिक व आर्थिक फटका सहन करावा लागत असे निदर्शनास आणून दिले जात पडताळणी प्रमाणपत्र युद्धपातळीवर नाहीत दिल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मीनल दास शहराध्यक्ष शिरीष जगदाळे वैद्यकीय कक्षाचे ज्योतिबा गुंड जिल्हा सचिव सिद्धाराम सवळे शहर संघटक सतीश वावरे जिल्हा कार्याध्यक्ष लखन पारशे जिल्हा संघटक दिलीप निंबाळकर शहर उपाध्यक्ष फिरोज सय्यद अथर्व धोत्रे मुकुल मानवी शेखर कंटेकर आदी उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment