Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, June 5, 2025

शिवशक्ती भीमशक्ती ग्राहक संरक्षण संघ चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष साथी नितिन कांबळे यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल..



सारा न्यूज नेटवर्क - 

शिवशक्ती भीमशक्ती ग्राहक संरक्षण संघ चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष साथी नितिन कांबळे यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल.. 


 मुंबई (प्रतिनिधी) :- दिं ४/५/२५ रोजी मंत्रालय मुंबई येथे मा.मुख्यमंत्री साहेब, मा. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री, मा. प्रधान सचिव अन्न नागरी पुरवठा विभाग यांना शिवशक्ती भीमशक्ती ग्राहक संरक्षण संघ चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष साथी नितिन कांबळे यांनी खालील तक्रार दाखल केली आहे.

१) अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय सोलापूर यांना पुराव्यानिशी तक्रार दाखल करून ही दोषी अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करत नाहीत उलट त्यांना पाठीशी घालून पळवाट काढत आहे. 

२) परिमंडळ अधिकारी कार्यालय अ, क, ड विभागात झिरो कर्मचारी दलाल यांना कॉन्ट्रॅक्ट बेस वरी नोकरीस घेण्यात आले आहे त्यांना तत्काळ काढून गुन्हा दाखल करावे व अ, ब, क, ड विभागात अधिकारी कर्मचारी स्वतःच्या फायद्यासाठी कार्यालयात बेकायदेशीर झिरो कर्मचारी दलाल यांना ठेवले आहे त्यांच्याकडून महत्त्वाची कामे करून घेतात संबंधित अधिकारी कर्मचारी व झिरो कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई अन्नधान्य वितरण अधिकारी करत नाहीत.

३) रास्त भाव धान्य दुकान ब ३४ प्रमाणे ब ५,६,७,१७, २९,३२, ३७,३८,४८ याही दुकानावर दंड व सहा महिने निलंबित करण्यात यावे.

४) गवळी व वाघ यांची बदली झालेली असताना ही ते परिमंडळ कार्यालय ब विभागात कामे करत असतात अन्नधान्य वितरण अधिकारी कारवाई करत नाहीत.

५) सोलापूर शहरातील अ, क, ड विभागातील दुकानात मोठ्या प्रमाणात मिमिक्री प्रकार झालेलं असताना अन्नधान्य वितरण अधिकारी चौकशी करत नाहीत.

६) पुरवठा उपायुक्त कार्यालय पुणे यांनी सोलापुरातील दुकान तपासणी करण्याकरिता FDO यांना आदेश दिले होते त्या नुसार तत्कालीन परिमंडळ अधिकारी ब विभाग वाघ व तत्कालीन पुरवठा निरीक्षक देशमुख यांना अ विभागाची तपासनीस नेमले होते नेमलेल्या ठिकाणी न जाता वरिष्ठांच्या आदेशाला कचराकुंडीत फेकून ड विभागात दुकान तपासनीस गेले होते अशा अधिकाऱ्यांवर अन्नधान्य वितरण अधिकारी कारवाई करत नाहीत वाघ,देशमुख यांना का पाठीशी घालत आहेत.

मी पुराव्यानिशी पुरवठा उपायुक्त पुणे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती त्यानुसार FDO कार्यालयात उपायुक्त पुणे यांचे कार्यवाही चे पत्र आले होते ते पत्र व सोबत जोडलेले कागद पत्रे संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी नष्ट केले आहेत याबाबत तक्रार दाखल करून ही कारवाई केली जात नाही त्याची संपूर्ण चौकशी करून संबंधित अधिकारी कर्मचारी व यांना संरक्षण देणारे अधिकारी कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

७) ब व विभागातील तत्कालीन अव्वल कारकून कुंभार यांचा वाढदिवस वाघ,देशमुख, कट्टिमणी,रेशन दलाल,रेशन दुकानदार हे ब विभाग शासकीय कार्यालयात साजरा केले आहेत त्यांच्यावर सेवा नियम शिस्त अपील वर्तणूक नियम नुसार कारवाई करून निलंबित करण्यात यावे.

८) वादग्रस्त अधिकारी वाघ यांना निलंबित करण्याऐवजी पदोन्नती देण्यात आली होती आम्ही मा. मुख्यमंत्री साहेब व संबंधित अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती आमच्या तक्रारीची दाखल घेऊन मा शासनाने वाघ यांची पदोन्नती ला स्थगिती दिली आहे वाघ यांना पदोन्नती देण्यात येऊ ने त्यांना निलंबित करण्यात यावे.

९) वाघ व गवळी यांच्या विरोधात नागरिकांनी शेकडो तक्रारी दाखल केले आहेत आणि आमचे ही पुराव्यानिशी तक्रार दाखल आहेत वाघ व गवळी यांची मंत्रालयातील उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करून सेवेतून बडतर्फ करण्यात यावे.

१०) अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय सोलापूर व परिमंडळ अधिकारी अ, ब, क, ड विभाग कार्यालयात दखल असलेले सर्व तक्रारी चे आणि गवळी,वाघ यांच्या विरोधातील दाखल असलेले सर्व तक्रारीवर मंत्रालयातून विशेष पथक नेमून ऑडिट करावे.

११) अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय व अ, ब, क, ड विभागातील अधिकारी कर्मचारी नियम धाब्यावर बसवून कामकाज करतात त्यांच्यावर सेवा नियम शिस्त अपील वर्तणूक नियम आणि दप्तर दिरंगाई कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी.


सदरील १ ते ११ तक्रारी संदर्भात अंतिम निर्णय घेऊन संबंधित दोषींवर निलंबन व बडतर्फ सारखी कार्यवाही करावी अन्यथा १५ दिवसाने पुरवठा विभागाच्या नावाने आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा साथी नितिन कांबळे यांनी दिले आहे. मा. सेक्टरी साहेब यांनी तक्रारीवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन देऊन आम्हाला चांगले प्रतिसाद दिले आहे.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment