सारा न्यूज नेटवर्क -
दैनिक एकमतचे रणजित जोशी, दै तरुण भारत संवादचे गौतम गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त गुलाबपुष्पाचा हार घालून सत्कार..
सोलापूर : पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून गेले अनेक वर्षापासून सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रशासन दरबारात आवाज उठवणाऱ्या दैनिक एकमतचे रणजित जोशी व दैनिक तरूण भारत संवादचे गौतम गायकवाड यांचा वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्हा परिषद येथे पत्रकार बांधव,अप्पासाहेब लंगोटे व अनिल शिराळकर मित्र परिवार वतीने पुष्पहार पुष्पगुच्छ शाल व मानाची टोपी देऊन पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हाअध्यक्ष तथा सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी दैनिक शिवनिर्णय चे संपादक अनिल शिराळकर, तिसरी आँख मानवाधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे, साप्ताहिक यश संघर्षचे संपादक सादिक शेख, सुधीर डोळे संपादक शिवशक्ती भीमशक्ती, दैनिक सुराज्यचे बळीराम सर्वगोड, नितीन करजोळै अध्यक्ष कामगार मोर्चा श्रीराम सेनेचे सिध्दराम नंदरगी, पत्रकार महेश भालेराव इत्यादी पत्रकार बांधव व सामाजिक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment