सारा न्यूज नेटवर्क -
लाडक्या बहिणीकडून लाडक्या भावाला शिवसेनेची राखी;
सोलापुरातून एकनाथ शिंदे साहेबांना एक लाख राख्या पाठवण्याचा संकल्प..
महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी *माझी लाडकी बहीण योजना'* सुरू करून राज्यातील कोट्यवधी बहिणींना खऱ्या अर्थाने भाऊ म्हणून आधार दिला. या योजनेमुळे बहिणीच्या संसाराला हातभार लागला आणि भावाचे प्रेम काय असते हे शिंदे साहेबांनी दाखवून दिले.
या प्रेमाची परतफेड म्हणून रक्षाबंधनाचे औचित्य साधून *लाडक्या बहिणीकडून लाडक्या भावाला शिवसेनेची राखी* हा अनोखा उपक्रम सोलापुरात राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत सोलापुरातून एक लाख राख्या गोळा करून आपल्या लाडक्या भावाला म्हणजेच मा. एकनाथजी शिंदे साहेबांना पाठवण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
हा उपक्रम दि. २४ ते २६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सोलापुरात विविध ठिकाणी राबविण्यात येणार आहे. घरोघरी जाऊन लाडक्या बहिणींकडून राख्या जमा करण्यात येणार असून अनेक ठिकाणी ३ दिवस राखी जमा करण्यासाठी बॉक्स ठेवण्यात येणार आहेत.
सदर संकल्प राज्यसभा खासदार मा. डॉ. ज्योतीताई वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. *"सर्वसामान्य बहिणीचा सन्मान हाच एकनाथ शिंदे साहेबांचा खरा विचार आहे,"* हाच विचार घेऊन आम्ही हा उपक्रम राबवत आहोत.
संपूर्ण उपक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी श्री. प्रकाशभाऊ राठोड, अध्यक्ष, सेवा फाउंडेशन यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे. जमा झालेल्या राख्या प्रत्यक्ष मुंबई येथे जाऊन शिंदे साहेबांना देण्यात येणार आहेत.
या उपक्रमासाठी श्री. प्रकाश राठोड हे स्वतः दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. ते फक्त राखी जमा करत नाहीयेत, तर शिवसेनेची विचारधारा, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि आपले लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेबांचे कार्य घरोघरी लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवत आहेत.
*या उपक्रमातील विशेष आकर्षण -*
*लाडक्या बहिणीकडून लाडक्या भावाला शिवसेनेची राखी* या उपक्रमातून जमा झालेल्या राख्यांमधून ३ लाडक्या बहिणींच्या राख्या मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते *लकी ड्रॉ* द्वारे काढण्यात येणार आहेत. ज्या ३ लाडक्या बहिणींची राखी निवडली जाईल, त्या विजेत्या बहिणींना आकर्षक गिफ्ट आणि विशेष बक्षीस देण्यात येणार आहे.
लाडकी बहीण योजना ही फक्त योजना नसून भावाने बहिणीला दिलेला शब्द आहे, हा विश्वास प्रकाशभाऊ प्रत्येक घरात जाऊन बहिणींना समजावून सांगत आहेत. त्यांच्या या निस्वार्थ मेहनतीमुळे सोलापुरात शिवसेना अधिक मजबूत होत असून, लाडक्या बहिणींचा लाडक्या भावावरील विश्वास अधिक दृढ होत आहे.
तरी सर्व लाडक्या बहिणींनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या लाडक्या भावाला एक राखी पाठवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
ज्यांना राखी पाठवायची आहे तसेच अधिक माहितीकरिता
संपर्क साधावा -
श्री. विनोद राठोड - 9834057506
श्री. संतोष जाधव - 9657445083

No comments:
Post a Comment