Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Saturday, November 28, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 



शिव वाहतूक सेनेच्या शहर जिल्हाप्रमुखपदी राजाभाऊ कुसेकर यांची नियुक्ती.. 

सोलापूर (प्रतिनिधी) :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिव वाहतूक सेनेच्या शहर जिल्हाप्रमुखपदी राजाभाऊ कुसेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


शिवसेना उपनेते आणि शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष डॉ. भाऊ कोरगावकर आणि सरचिटणीस निलेश भोसले यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली.


शिवसेना उपनेते आणि शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष डॉ. भाऊ कोरगावकर यांच्या हस्ते शिव वाहतूक सेनेचे नूतन शहर जिल्हाप्रमुख राजाभाऊ कुसेकर यांना मुंबई येथे निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी शिवसेना भवन, मुंबई येथे निवडीचे पत्र देण्यात आले.


यावेळी शिवसेना वाहतूक सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दर्शनसिंग कोच्चर, धाराशिव जिल्हा महिला संपर्क प्रमुख सायरा मुलाणी, नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख काशिनाथ वासुतकर, जुबेर शेख, संतोष डांगे, बबलू मुल्ला, उदय पवार, सादिक शेख, दीपक पेटकर, अनिल पवार, दिलावर खान, सतीश माने आदी शिवसैनिक उपस्थित होते.


राजाभाऊ कुसेकर यांच्या नियुक्तीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.



No comments:

Post a Comment