Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Wednesday, October 28, 2026

SARA NEWS NETWORK

सारा न्यूज नेटवर्क - 



 श्री वसंतराव नाईक हायस्कूलमध्ये सुरक्षित बचपन अभियान संपन्न;

विद्यार्थ्यांना बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि स्वसंरक्षणाबाबत मार्गदर्शन


सोलापूर :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर आणि श्री वसंतराव नाईक हायस्कूल, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दिनांक २७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रशालेत ‘सुरक्षित बचपन अभियान’ उत्साहात संपन्न झाले.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री. कार्तिक चव्हाण सर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूरचे सचिव आदरणीय श्री. अमोल कुमार देशपांडे साहेब उपस्थित होते. यावेळी प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. युवराज पारधे सर, सर्व शिक्षक-शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


या अभियानांतर्गत न्यायमूर्ती श्री. अमोल कुमार देशपांडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना बालकांचे हक्क, अठरा वर्षांखालील मुला-मुलींचे शारीरिक व लैंगिक शोषण रोखण्याचे उपाय, अशा प्रकारच्या गैरवर्तनाविरोधात प्रतिकार करण्याचे मार्ग तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी स्वतःचे संरक्षण कसे करावे, अनुचित प्रकार घडल्यास कोणाची मदत घ्यावी आणि समाजात याबाबत जनजागृती कशी करावी, याविषयी त्यांनी बहुमोल मार्गदर्शन केले.


यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. कार्तिक चव्हाण यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या सुरक्षिततेबाबत जागरूक राहावे, कोणत्याही अनुचित प्रकाराबाबत न घाबरता विश्वासू व्यक्तींकडे मदत मागावी आणि आपल्या हक्कांची जाणीव ठेवावी, असे आवाहन करण्यात आले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे सहशिक्षक श्री. गणेश राठोड यांनी केले, तर श्री. अविनाश कुंभार यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.




No comments:

Post a Comment