सारा न्यूज नेटवर्क -
मंद्रूप ग्रामपंचायतीला पूर्णवेळ ग्रामसेवक द्या; ग्रामस्थांचे खासदार प्रणिती शिंदे यांना निवेदन;
त्यांनी तात्काळ दक्षिण सोलापूरचे गटविकास अधिकारी यांच्याशी फोनवरून संपर्क साधला..!
मंद्रूप प्रतिनिधी : दक्षिण सोलापूर
मंद्रूप ग्रामपंचायतीचा कारभार सुरळीत चालण्यासाठी आणि रखडलेल्या विकासकामांना गती देण्यासाठी येथे तातडीने पूर्णवेळ ग्रामसेवकाची नियुक्ती करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांनी व पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या संदर्भात सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांना नुकतेच एक निवेदन देण्यात आले.
ग्रामस्थांच्या या मागणीची गांभीर्याने दखल घेत खासदार प्रणिती शिंदे यांनी तत्परता दाखवली. त्यांनी तातडीने दक्षिण सोलापूरचे गटविकास अधिकारी (बीडीओ) यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि मंद्रूपचा हा प्रश्न प्राधान्याने व लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या कडक सूचना दिल्या.
निवेदनातील मुख्य मुद्दे
पूर्णवेळ ग्रामसेवक नसल्यामुळे ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज प्रभावित होत आहे.
दाखले आणि इतर शासकीय कामांसाठी नागरिकांना नाहक हेलपाटे मारावे लागत आहेत. शासकीय योजना आणि विविध विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी रखडली आहे.
निवेदन देताना काँग्रेसचे महमद शेख, ग्रामपंचायत सदस्य शिवानंद लोभे, यासीन मकानदार, बाबूलाल लिगेवाण, सिद्धाराम काळे, शिवाजी चव्हाण यांच्यासह अनेक प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते.
खासदारांच्या थेट हस्तक्षेपानंतर आता मंद्रूपला लवकरच पूर्णवेळ ग्रामसेवक मिळून नागरिकांच्या अडचणी दूर होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.


No comments:
Post a Comment