सारा न्यूज नेटवर्क -
कुमार प्रल्हाद धोंगडे यांच्या पुढाकाराने प्रभागातील नागरी समस्यांवर तातडीने उपाययोजनांची मागणी;
आम आदमी पार्टीचा महानगरपालिकेकडे पाठपुरावा..
पुणे, दि. २४ ऑगस्ट २०२६ :
आम आदमी पार्टी, पुणे शहरचे उपाध्यक्ष कुमार प्रल्हाद धोंगडे यांच्या पुढाकाराने त्यांच्या प्रभागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध नागरी समस्यांच्या तातडीने सोडवणुकीसाठी आज पुणे महानगरपालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आले.
अप्पर सुप्पर इंदिरानगर, अंबामाता मंदिर चौक, सुखसागर नगर परिसरातील अनधिकृत भाजी स्टॉल, अतिक्रमणे, रस्त्यावरील अनधिकृत पार्किंग, अरुंद झालेले रस्ते व फुटपाथ यामुळे नागरिक, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः अंबामाता चौकातील भाजी मार्केट परिसरातील अनधिकृत व्यवसायामुळे वाहतूक कोंडी आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
तसेच अंबामाता मंदिर ते खंडोबा मंदिर परिसरातील फुटपाथची दुरवस्था दूर करून आवश्यक ठिकाणी नवीन फुटपाथ बांधावा, अस्तित्वातील फुटपाथ दुरुस्त करून नागरिकांसाठी खुला करावा, फुटपाथवरील अतिक्रमणे व अनधिकृत पार्किंग हटवावे आणि दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.
या परिसरातील वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या, अतिक्रमणे, फुटपाथ, रस्ते, विद्युत पोल तसेच DP रोड यासंबंधीच्या प्रश्नांवर संबंधित विभागांनी संयुक्त पाहणी करून ठोस व कालबद्ध उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली.
कुमार प्रल्हाद धोंगडे यांच्या पुढाकाराने संबंधित अधिकाऱ्यांकडे केवळ तक्रार न करता प्रत्यक्ष पाहणी करणे, जबाबदार विभाग निश्चित करणे आणि प्रत्येक समस्येवर निश्चित कालमर्यादेत कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला आहे.
महानगरपालिका नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कर वसूल करते. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित रस्ते, स्वच्छ व मोकळे फुटपाथ, सुरळीत वाहतूक आणि आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे.
«“नागरिकांच्या मूलभूत हक्कांशी संबंधित प्रश्नांकडे दुर्लक्ष होऊ देणार नाही. प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून कार्यवाही करावी; अन्यथा नागरिकांच्या प्रश्नांसाठी आम आदमी पार्टी पुढील आंदोलनात्मक भूमिका घेईल.”»
— कुमार प्रल्हाद धोंगडे
उपाध्यक्ष, आम आदमी पार्टी – पुणे शहर
यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते :
१. श्री. सुदर्शन जगदाळे — शहराध्यक्ष, आम आदमी पार्टी पुणे शहर
२. सौ. आरती ताई करंजवणे — महिला शहराध्यक्षा, आम आदमी पार्टी पुणे शहर
३. सौ. सुनीता काळे — माजी शहराध्यक्ष, आम आदमी पार्टी
४. श्री. कुमार धोंगडे — उपाध्यक्ष, आम आदमी पार्टी पुणे शहर
५. श्री. संतोष काळे — उपाध्यक्ष, आम आदमी पार्टी पुणे शहर
६. श्री. अभिजीत गायकवाड — उपाध्यक्ष, आम आदमी पार्टी पुणे शहर
७. श्री. सुभाष कारंडे — महासचिव, आम आदमी पार्टी पुणे शहर
८. श्री. शंकर थोरात — सचिव, आम आदमी पार्टी पुणे शहर
९. श्री. सुनील सौदी — सचिव, आम आदमी पार्टी पुणे शहर
१०. श्रीमती शितल विश्वनाथ कांडेलकर — शहराध्यक्ष, शिक्षक आघाडी, आम आदमी पार्टी पुणे शहर
११. श्री. मिलिंद सरोदे — शहराध्यक्ष, बांधकाम विभाग, आम आदमी पार्टी
१२. श्री. मिलिंद ओव्हाळ — उपाध्यक्ष, युवा आघाडी, आम आदमी पार्टी पुणे शहर
१३. श्रीमती माधुरी मठ / माधुरी गायकवाड — माजी पदाधिकारी, आम आदमी पार्टी पुणे शहर
१४. श्री. अरुण केदारी — कार्यकर्ते, आम आदमी पार्टी
१५. श्री. मुकेश गायकवाड — कार्यकर्ते, आम आदमी पार्टी पुणे शहर


No comments:
Post a Comment