सारा न्यूज नेटवर्क -
श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या उत्कृष्ट व्यवस्थापनात पुर्वीसारखेच सातत्य - पोलीस उपायुक्त प्रितमकुमार यावलकर
श्री स्वामी समर्थांच्या दर्शनानंतर पोलीस उपायुक्त प्रितमकुमार यावलकर यांचे मनोगत
शहर सोलापूर पोलीस उपायुक्त पदी पदोन्नती झाल्याबद्दल प्रितमकुमार यावलकर व कुटूंबियांचा महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार.
अक्कलकोट :- (श्रीशैल गवंडी दि.१८/०५/२६)
येथील वटवृक्ष निवासी श्री स्वामी समर्थांच्या निस्सीम स्वामी भक्तीला स्मरत आज येथे येऊन मनोभावे श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेवून लाभलेलं समाधान अतुलनीय व संस्मरणीय आहे. अनेक दिवसांनी स्वामी दर्शनाचा लाभ मिळाल्याने दर्शनाची ही बाब माझ्या व माझ्या कुटूंबियांसाठी खास आहे. मंदीर समितीचे प्रमुख महेश इंगळे हे अत्यंत विनम्रभावे आमचे आदरतिथ्य करुन व श्री स्वामी दर्शन प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित राहून श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र देवून आमचा सन्मान केल्याने स्वामींच्या आशिर्वादाची आज पुन्हा एकदा प्रचिती आली. एकंदरीत श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या उत्कृष्ट व्यवस्थापनात पुर्वीसारखेच सातत्य असल्याचे मनोगत सोलापूर जिल्ह्याचे मावळते अप्पर पोलीस अधीक्षक व सोलापूरचेच नुतन पोलीस उपायुक्त प्रितमकुमार यावलकर यांनी व्यक्त केले.
ते नुकतेच आपली सोलापूरच्या पोलीस उपायुक्त पदी वर्णी लागल्यानंतर पोलीस उपायुक्त पदाचा पदभार स्विकारायच्या पुर्व संद्येला
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानास सहकुटूंब भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे
यांनी पोलीस उपायुक्त प्रितमकुमार यावलकर व कुटूंबीयांचा श्रींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी मंदिर व्यवस्थापनातील सातत्य, शिस्त, स्वच्छता व प्रसन्न वातावरणातील सातत्य पाहून पोलीस उपायुक्त प्रितमकुमार यावलकर बोलत होते. पुढे बोलताना पोलीस उपायुक्त प्रितमकुमार यावलकर यांनी सोलापूरच्या
पोलीस उपायुक्त पदाच्या माध्यमातून व पोलीस खात्याच्या सेवेतून श्री स्वामी भक्तांच्या सेवेतही आपण सदैव तत्पर राहू असे सांगून श्री स्वामी समर्थांचे आशिर्वाद व मंदीर समितीच्या शुभेच्छा पाठीशी घेऊन आपण मार्गक्रमण करु असे मनोगत व्यक्त केले व मंदीर समितीच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रथमेश इंगळे, नगरसेवक बाळा शिंदे, नगरसेवक अविनाश मडिखाबे, पोलिस निरीक्षक दिपक भिंताडे, देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, श्रीशैल गवंडी, सागर गोंडाळ इत्यादी उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे

No comments:
Post a Comment