सारा न्यूज नेटवर्क -
🌳 सोलापूर - विजापूर नॅशनल हायवे होणार हरित मार्ग! 🌳
102 किमी वर दुतर्फा झाडे लावण्याची मागणी.
उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांची नितीन गडकरींकडे भेट.
सोलापूर :- सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी केंद्रीय परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्री भारत सरकार मा. नितीन गडकरी यांची भेट घेऊन राष्ट्रीय महामार्गावरील वृक्षतोड थांबविणे तसेच मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याबाबत महत्त्वपूर्ण मागणी केली.
यावेळी राष्ट्रीय महामार्ग क्र. 54 वरील सोलापूर ते विजापूर मार्गाच्या 102 किलोमीटर परिसरात दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात यावीत, पर्यावरण संवर्धनाला चालना मिळावी तसेच भविष्यातील पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण व्हावा, यासंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली.
केंद्रीय मंत्री मा. नितीन गडकरी यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी दिली. यावेळी विद्यमान आमदार मा. सुभाष देशमुख साहेब यांचेही मार्गदर्शन लाभले सात्विक बडवे ,प्रशांत बडवे पंचायत समिती सदस्य अंबिका पाटील पर्यावरण दूत डॉ मनोज देवकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पर्यावरण संरक्षण, प्रदूषण नियंत्रण आणि हरित भारताच्या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड होणे काळाची गरज असल्याचे मत उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी देवकर यांनी व्यक्त केले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - डॉ.राम हुंडारे


No comments:
Post a Comment