Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, May 1, 2026

SARA NEWS NETWORK

सारा न्यूज नेटवर्क - स्वामी विवेकानंद प्रशालेत महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा -------------------------------------------- सोलापूर : - *नॅब संचलित स्वामी विवेकानंद प्रशाला* एमआयडीसी सोलापूर येथे आज *महाराष्ट्र दिन व कामगार दिन* उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रशालेचे *मुख्याध्यापक डॉ. हणमंत नारायणकर सर* व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका *सौ.सविता व्हनमाने* उपस्थित होते. प्रारंभी *मा. यशवंतराव चव्हाण* यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले .
राज्यभरात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा आणि परंपरेचा सन्मान करण्याचा हा लोकांसाठी अभिमान आणि आनंदाचा दिवस असतो. संपूर्ण महाराष्ट्रात रंगीबेरंगी कार्यक्रम, मिरवणुका सांस्कृतिक कार्यक्रम आणि देशभक्तीच्या उत्साहाने जिवंत होतात. महाराष्ट्र दिनाच्या सोहळ्यातील प्रमुख आकर्षण म्हणजे *पारंपरिक लोकनृत्य, संगीत कार्यक्रम आणि पथनाट्ये* यांसारख्या महाराष्ट्राच्या चैतन्यमय सांस्कृतिक विविधतेचे दर्शन आपणास होते. महाराष्ट्र दिन आपल्याला मराठी भाषिक समाजाच्या हक्कांसाठी आणि प्रतिष्ठेसाठी लढलेल्या असंख्य व्यक्तींच्या त्यागाची आठवण करून देतो. हा दिवस त्यांच्या वारशाचा सन्मान करण्याचा आणि महाराष्ट्राची ओळख असलेल्या एकता, विविधता आणि प्रगती या मूल्यांना जपण्याची शपथ घेण्याचा आहे. याप्रसंगी प्रशालेतील सहशिक्षक *सपताळे सर, माने सर,राठोड सर, कोळी सर, हिंगमिरे मॅडम, मिरेकर सर, बनसोडे मॅडम, शहापुरे मॅडम* उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन *शहापुरे मॅडम* व आभार *सुभाष माने सर* यांनी मानले. सारा न्यूज नेटवर्क संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment