Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, May 27, 2026

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूरात 1 जून रोजी भव्य सामूहिक वाढदिवस सोहळा.. 

 वाढदिवस धारकांचा होणार सन्मान; समाजात जिव्हाळा आणि माणुसकी जपणारा अनोखा उपक्रम.. 


सोलापूर : - हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित आणि मा. उपमुख्यमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या जनसामान्यांप्रती असलेल्या सेवाभावी, लोकाभिमुख नेतृत्वातून प्रेरणा घेत मा. श्री. प्रकाशभाऊ राठोड (मा. सहाय्यक आयुक्त तथा विशेष कार्यकारी अधिकारी) यांच्या वतीने सोमवार, दिनांक 1 जून 2026 रोजी सोलापूर येथे भव्य सामूहिक वाढदिवस सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच गुणवंत विद्यार्थी सन्मान व विविध शासकीय पदावर कार्य करून सेवानिवृत झालेल्या मान्यवरांचे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे

आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस माणसांपासून दूर जात असताना समाजात प्रेम, जिव्हाळा, बंधुभाव आणि आपुलकीचे नाते अधिक दृढ व्हावे, प्रत्येक सामान्य व्यक्तीचा वाढदिवस सन्मानाने आणि आनंदाने साजरा व्हावा या उदात्त भावनेतून हा आगळावेगळा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. 

“वाढदिवस हा फक्त केक कापण्याचा क्षण नसून आपल्या माणसांच्या प्रेमात आणि सन्मानात जगण्याचा आनंदोत्सव आहे,” अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली.

चाणक्य गुरुकुल व बसव संगम शेतकरी गट यांच्या संयुक्त विद्यमाने  श्री काशिनाथ भतगुणकी समन्वयक  सोहळ्यात 1 जून रोजी वाढदिवस असणाऱ्या सर्व व्यक्तींसाठी सामूहिक केक सेलिब्रेशन, सन्मान सोहळा, स्नेहभोजन तसेच आनंदी वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 


कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी सोलापूरच्या कन्या नूतन खासदार ज्योतीताई वाघमारे,

खासदार धैर्यशील माने, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे

माजी.मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, शिवसेना लोकसभा संपर्क  प्रमुख महेशनाना साठे

जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक अमोल शिदे

नगरसेवक प्रियदर्शन साठे, जिल्हा प्रमुख अमर पाटील

जिल्हा प्रमुख चरणराज चवरे, शहर प्रमुख सचिन चव्हाण

माजी नगरसेविका शैलजाताई राठोड, 

यांच्या सह विविध मान्यवर उपस्थित राहणार 

समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार असून,यामध्ये पत्रकार,शिक्षक,सामाजिक कार्यकर्ते  सहभागी वाढदिवस धारकांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, मानाचा फेटा, शाल आणि पवित्र रोप भेट देऊन गौरव करण्यात येणार आहे.

शिवसेना ही केवळ राजकीय संघटना नसून जनसामान्यांच्या सुख-दुःखात कायम उभी राहणारी ताकद आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आपुलकी आणि माणुसकी पोहोचवण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

हा भव्य सोहळा सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत श्री सिद्धेश्वर रिसॉर्ट फॅमिली गार्डन रेस्टॉरंट, गजानन महाराज मंदिराजवळ, सोरेगाव ते कुमठे रोड, विजापूर रोड, सोलापूर येथे संपन्न होणार असून, सन्मान सोहळ्यासाठी पूर्व नावनोंदणी आवश्यक आहे.

तरी 1 जून रोजी वाढदिवस असणाऱ्या नागरिकांनी तसेच त्यांच्या मित्र, नातेवाईक, सहकारी आणि परिचितांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

*1 जून रोजी वाढदिवस असणाऱ्या लोकांचे नावनोंदणी*

संपर्क - 

📞. 7219099955 / 9890948388 / 9834303637/

8484952020


सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - डॉ.राम हुंडारे 

No comments:

Post a Comment