सारा न्यूज नेटवर्क -
कोल्हापूर - शिरगाव एमआयडीसी येथील महालक्ष्मी इंजीनियरिंगला नगरसेवक महेश इंगळे यांची मित्रपरिवारासह सदीच्छा भेट.
कोल्हापूर (श्रीशैल गवंडी,दि.२४/०५/२०२६ ):- येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी आज आपल्या नियोजित कोल्हापूर दौर्याअंतर्गत कोल्हापूर - शिरगाव एमआयडीसी येथील महालक्ष्मी इंजीनियरिंगला सदीच्छा भेट दिली.
यावेळी महालक्ष्मी इंजीनियरिंगच्या वतीने संस्थापक संदीप पाटील यांच्या वतीने स्वामी सेवक महेश इंगळे यांचं वाजत गाजत ओवाळणी करून स्वागत व सन्मान करण्यात आला. यावेळी शिरगाव एमआयडीसी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासना रूढ मूर्तीचे पूजन
स्वामी सेवक महेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित स्वामी भक्तांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी नामाचा जप तसेच स्वामींचा जयघोष करण्यात आला. यावेळी महालक्ष्मी इंजीनियरिंगचे संस्थापक संदीप पाटील हे नास्तिकतेकडून अध्यात्मिकतेकडे कसे वळले. श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंदिर उभारण्याचा दृष्टांत कसा झाला ते सांगितले. अशक्य असे कार्य श्री स्वामी समर्थ सहजपणे कसे करून घेतात, सर्व अडचणी दूर करतात याचेही विश्लेषण संदीप पाटील यांनी यावेळी केले. या प्रसंगी महालक्ष्मी इंजीनियरिंगचे कर्मचारी दिलीप पाटील, कुंदन पाटील, दीपक पाटील, संग्राम खामकर, श्रीरंग सौदे, सुषमा पाटील, दिपाली पाटील, निलाबाई सौदे, विनायक पाटील, महेश मालक इंगळे मित्र परिवारातील प्रा.शिवशरण अचलेर सर, अंकुश केत, ज्ञानेश्वर भोसले, सागर गोंडाळ, श्रीशैल गवंडी, बाळासाहेब एकबोटे, सुनील पवार, सोमनाथ सुतार, सागर गोंडाळ, श्रीकांत झिपरे, मनोज जगताप सर, विश्वनाथ देवरमनी सर, कुमार हत्तुरे, कलशेट्टी सर, विद्याधर गुरव सर, रमेश शिंदे सर, सुनिल पवार, काका सुतार, सुरेश वाले सर, ओमकार उटगे, स्वामीनाथ मुसळे, अमर पाटील, संदीप पंडीत, नामदेव माने उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - डॉ. राम हुंडारे
No comments:
Post a Comment