Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, May 10, 2026

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

🌱मातृत्व दिनानिमित्त ‘आईच्या नावे एक झाड’ उपक्रम उत्साहात संपन्न 🌱


सोलापूर : - मातृत्व दिनाचे औचित्य साधत शासनाच्या “आईच्या नावे एक झाड” या संकल्पनेला प्रतिसाद देत तसेच पंतप्रधानांनी दिलेल्या “एक पेड़ माँ के नाम” या आवाहनानुसार आज विणकर उद्यान येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

यावेळी आपल्या वसुंधरा मातेला प्रणाम करत मातृत्व दिन वृक्षारोपणाद्वारे अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पुढील काळातही सातत्याने वृक्षलागवड व संवर्धन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या कार्यक्रमास शहराच्या वसुंधरा रक्षक तथा उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी महेश देवकर, स्वीकृत नगरसेवक ज्ञानेश्वर मायकल सर, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सर, विशेष कार्यकारी अधिकारी महेशजी देवकर, पर्यावरण दूत डॉ. मनोज देवकर, उद्यान विभागाचे कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. मातृत्व दिनानिमित्त आईप्रती कृतज्ञता व्यक्त करत वृक्षसंवर्धनाची शपथ घेण्यात आली.

पुढील काळात सोलापूर महानगरपालिका, विविध शासकीय विभाग, संस्था व पर्यावरणप्रेमी नागरिक यांच्या लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व संवर्धन करण्यात येणार असल्याची माहिती उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी दिली.

🌍 “आईच्या नावे एक झाड, पृथ्वीच्या रक्षणासाठी सकारात्मक पाऊल” असा प्रेरणादायी संदेश यावेळी देण्यात आला.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment