सारा न्यूज नेटवर्क -
उपमहापौर सौ ज्ञानेश्वरी महेश देवकर यांची सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्राला भेट..
पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करणार..
सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर शहरातील हद्दवाढ भागांमध्ये सात ते आठ दिवसांनी होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची मागणी वाढल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
या पार्श्वभूमीवर मा. उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी आज सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून पाणीपुरवठ्याचे योग्य व प्रभावी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याची उपलब्धता, शुद्धीकरण प्रक्रिया आणि एकूण क्षमता यांची तपासणी करण्यात आली.
तसेच जुळे सोलापूर येथील पाण्याच्या टाकीची पाहणी करून पाणीसाठवण क्षमता, पाणीपुरवठ्याची व्यवस्था, तसेच पाण्याची स्वच्छता व पिण्यायोग्यता यांची पडताळणी करण्यात आली. पाणी उपसण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मोटारींची क्षमता व कार्यक्षमता यांचाही आढावा घेण्यात आला.
हद्दवाढ भागांतील नागरिकांना नियमित, पुरेसा व स्वच्छ पाणीपुरवठा कसा करता येईल याबाबत सखोल चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले.
या पाहणीवेळी मा. नगरसेविका संगीता जाधव, मा. नगरसेविका वनिता पाटील, मा. नगरसेवक सत्यजित वाघमोडे, मा. नगरसेवक राजशेखर पाटील, बीजेपी मंडल अध्यक्ष महेश देवकर, सर्वा आरोग्य अभियंता श्री. चौबे, विभागीय कार्यालय क्र. ६ चे अधिकारी श्री. पानगल, विभागीय कार्यालय क्र. ५ चे अधिकारी श्री. तळीखेडे, कनिष्ठ अभियंता श्री. चव्हाण, पर्यावरण दूत मनोज देवकर, केमिस्ट सौ. इंडे मॅडम तसेच फिल्टर अटेंडंट श्रीमती ननवरे मॅडम उपस्थित होत्या.
नागरिकांना भेडसावणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून लवकरच परिस्थितीत सुधारणा होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे




No comments:
Post a Comment