Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, May 15, 2026

SARA NEWS NETWORK



सारा न्यूज नेटवर्क - 

 पत्रकार सुरक्षा समितीचा यल्गार  पत्रकारांच्या चारचाकी वाहनास टोलमधून सूट मिळणे बाबत रविवारी धरणे आंदोलन

प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार  यांची माहिती 

सोलापूर (प्रतिनिधी) :- पत्रकार हा लोकशाही चा चौथा स्तंभ असून ऊन वारा पाऊस अंगावर झेलत सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकारांना राजकीय सामाजिक शैक्षणिक त्याच बरोबर प्रशासना च्या बातम्या करण्यासाठी तालुका व विविध ग्रामीण भागातून जिल्ह्याच्या ठिकाणी कधी दुचाकी तर कधी चारचाकी वाहनातून प्रवास करावा लागतो जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यायल जिल्हा परिषद जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय सिव्हिल हॉस्पिटल जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा उद्योग कार्यालय तसेच विविध महामंडळाचे कार्यालय अशी अनेक शासकीय कार्यालये जिल्ह्याच्या ठिकाणी असतात तसेच आमदार खासदार कॅबिनेटमंत्री राज्यमंत्री यांचे दौरे नियोजन बैठका सभा मेळावे बऱ्याच वेळा जिल्ह्याच्या ठिकाणी असल्याने वार्ताकंन करण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकारांना जिल्ह्याच्या ठिकाणी चारचाकी वाहनाने यावं लागत आहे ग्रामीण भागातील काही पत्रकारांकडे चारचाकी वाहन असल्याने नेहमीच सोलापूर ला वृत्त संकलन करण्यासाठी टोल भरून यावं लागतं आहे शासकीय वृत्तसंकलन करण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकार बांधव रोजच जिल्ह्याच्या ठिकाणी येत असल्याने टोल चा आर्थिक भुर्दंड पत्रकार बांधवाना सहन करावा लागत आहे याबाबत पत्रकार सुरक्षा समिती वतीने दिनांक १६/७/२०२५ रोजी सोलापूर चे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले होते

 सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांच्या चारचाकी वाहनास टोल मधून सूट मिळणे बाबत पत्रकार सुरक्षा समितीने विभागीय आयुक्त पुणे यांची  दिनांक 12/9/2025 रोजी भेट घेऊन टोल मधून सूट मिळणे बाबत निवेदन सादर  करून  टोल मुक्तीची मागणी लावून धरली होती पत्रकारांच्या चारचाकी वाहनास टोल मधून सूट मिळणे बाबत अद्याप योग्य तो निर्णय न झालेने  अखेर पत्रकार सुरक्षा समितीने आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला असून पत्रकारांच्या चारचाकी वाहनास टोल मधून सूट मिळणे बाबत राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रविवार दिनांक 17/5/2026 रोजी जिल्हा परिषद (पूनम गेट ) या ठिकाणी सकाळी दहा वाजता आंदोलन करणार असल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी दिली असून या आंदोलनात पत्रकार बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केलं आहे.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - डॉ.राम हुंडारे 

No comments:

Post a Comment