Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, May 30, 2026

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

नगरसेवक महेश इंगळे यांच्या वतीने वटवृक्ष टर्फ क्रिकेट लीगचे आयोजन.

दि.२ जून रोजी आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या हस्ते होणार वटवृक्ष टर्फ क्रिकेट लीगचे उद्घाटन. 

उद्घाटन सोहळयानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन.

उद्घाटन सोहळ्यास लाभणार नगराध्यक्ष मिलन दादा कल्याणशेट्टी व अमोलराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती.

विजेत्या संघाला मिळणार रु.४५,५५५/- इतकी रक्कम व चषक.

   

अक्कलकोट (श्रीशैल गवंडी,दि.२९/०५/२६) :-

              येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक 

महेश इंगळे यांच्या वतीने मैंदर्गी - गाणगापूर रोडवरील स्व:मालकीच्या वटवृक्ष स्पोर्टस् टर्फवर वटवृक्ष टर्फ क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आल्याची माहिती या वटवृक्ष टर्फ क्रिकेट लीगचे आयोजक संदीप केत आणि स्वराज वाले यांनी दिली. 

        या वटवृक्ष टर्फ क्रिकेट लीगची सुरुवात दि २ जून पासून होणार आहे, तत्पूर्वी २ जूनला सायंकाळी ५ वाजता

नगराध्यक्ष मिलन दादा कल्याणशेट्टी, 

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले,

देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या हस्ते या वटवृक्ष टर्फ क्रिकेट लीगचे उद्घाटन होणार आहे. 


      या स्पर्धैत एकूण २० संघ सहभागी झाले आहेत. सर्व सामने ६ षटकांचे व लीग पध्दतीने खेळवले जातील. प्रत्येक संघात ८ + १ खेळाडू असतील. विजेत्या संघाला प्रथम पारितोषिक रु.४५,५५५/- व चषक. उपविजेत्या संघाला द्वितीय पारितोषिक रु.२५,५५५/- आणि तृतीय क्रमांकावरील संघाला रु.१५,५५५/- चे तृतीय पारितोषीक नगरसेवक महेश इंगळे यांच्या वतीने देण्यात येणार आहे.

प्रवेश फी रु.३९९९/- इतकी असेल.

सर्व सामने सायंकाळी ५ ते रात्री १० 

या वेळेत खेळवले जातील, तरी जास्तीत जास्त संघांनी या स्पर्धैत भाग घेऊन खेळाचा आनंद लुटावा असे आवाहन लीगचे आयोजक संदीप केत आणि स्वराज वाले यांनी केले आहे. 

         या लीगच्या उद्घाटन सोहळ्यानंतर आ.सचिन दादा कल्याणशेट्टी व नगराध्यक्ष मिलन दादा कल्याणशेट्टी 

व मान्यवरांच्या उपस्थितीत १० वी आणि 

१२ वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न होईल अशी माहिती युवा नेते प्रथमेश इंगळे यांनी दिली.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - डॉ. राम हुंडारे 

No comments:

Post a Comment