Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, May 3, 2026

SARA NEWS NETWORK

सारा न्यूज नेटवर्क - Ghकार्यसम्राट न्यूज चा 2 रा वर्धापन दिन उत्साहात साजरा अनेक मान्यवरांनी लावली हजेरी.. सोलापूर (प्रतिनिधी) अवघ्या दोन वर्षात तीन लाख 65 हजार वाचक वर्ग निर्माण केलेल्या कार्यसम्राट न्यूज ने पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून सोलापूर शहर जिल्हासह महाराष्ट्र राज्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक शासकीय निमशासकीय प्रशासकीय बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन कार्यसम्राट न्यूजने सोलापूर शहर जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यात आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे समाजातील वंचित पीडित घटकासाठी कार्यसम्राट न्यूजने निरपेक्ष निर्भीड व सडेतोड लेखन करून अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त लोकांच्या न्याय हक्कासाठी प्रशासन दरबारात कार्यसम्राट न्यूज च्या माध्यमातून आवाज उठवून त्यांना न्याय देण्याची भूमिका आजपर्यंत पार पाडली आहे कार्यसम्राट न्यूजचे तब्बल तीन लाख 65 हजार वाचक वर्ग असून पत्रकारिता व्यवसाय नसून ती सामाजिक बांधिलकी असल्याने कार्यसम्राट न्यूजने आपली पत्रकारिता पणाला लावून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे कार्यसम्राट न्यूज च्या बातमीने अनेक नागरिकांचे प्रश्न सुटले असून सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी कार्यसम्राट न्यूज ने कधीच तडजोड केलेली नाही. कार्यसम्राट न्यूज चा 2 रा वर्धापन दिन सोलापूर येथील समाज कल्याण केंद्र या ठिकाणी उत्साहात साजरा झाला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे.म्हणून
पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रामचंद्र सरवदे दैनिक शिवनिर्णय संपादक अनिल शिराळकर दैनिक कर्मयोगी चे संपादक संजय पवार पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब लंगोटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय सरचिटणीस अल्पसंख्यांक विभाग फारूक मटके सर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मीनाक्षीताई पेठे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे पत्रकार सुरक्षा समितीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कलीम शेख पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी यांची उपस्थिती लाभली या कार्यक्रमची सुरवात पत्रमहर्षी बाळशास्त्री जांभेकर व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यसम्राट न्युज चे संपादक यशवंत पवार यांनी केले असून कार्यसम्राट न्यूज च्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक सामाजिक राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन गेली दोन वर्षापासून निरपेक्ष निर्भीड व सडेतोड कार्यसम्राट न्यूजने प्रशासनात आपली पकड मजबूत केली असल्याचे सांगत समाजातील वंचित पिढीत घटकाच्या न्याय हक्कासाठी कार्यसम्राट न्यूज नेहमीच प्रशासन दरबारात आवाज काढत अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला वृत्तपत्र चालवणे कठीण बाब -अनिल शिराळकर सध्या वृत्तपत्र चालवणे अतिशय कठीण व अवघड बाब असून मोठ्या प्रमाणात खर्च येत असल्याने वृत्तपत्र चालवणे सध्या मुश्किल झाल्याचे दैनिक शिवनिर्णय चे संपादक अनिल शिराळकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले प्रामाणिक पत्रकारांची समाजाला गरज - सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मीनाक्षीताई पेठे समाजात पत्रकारांचे स्थान अतिशय मोलाचे असून पत्रकारांमुळेच अनेकांना न्याय मिळतो पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील घटकाची बाजू तो आपल्या लेखणीच्या माध्यमातून मांडत असतो पत्रकार हा समाजाचा आरसा म्हणून देखील काम करत असतो आज समाजामध्ये प्रामाणिक पत्रकारांची संख्या खूप कमी आहे यशवंत पवार यांनी आपल्या कार्यसम्राट न्यूज च्या माध्यमातून नेहमीच आपली निरपक्ष निर्भीड पत्रकारीता जपली असून प्रामाणिक पत्रकारांची समाजाला खरी गरज असल्याचे प्रतिपादन सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मीनाक्षीताई पेठे यांनी यावेळी केले आहे पत्रकारांच्या विषयावर यशवंत पवार यांनी आपलं उभा आयुष्य खर्ची घातलं आहे - विक्रम खेलबुडे यशवंत पवार यांना मी गेली वीस वर्षांपासून ओळखतो वृत्तपत्राबरोबरच त्यांनी पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे अवघ्या दोन वर्षात कार्यसम्राट योजने तब्बल तीन लाख साठ हजार वाचक वर्ग निर्माण केल्याने यशवंत पवार यांचे विशेष कौतुक करून कार्यसम्राट न्यूज दुसऱ्या वर्धापन दिनास श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम (बापू ) खेलबुडे यांनी शुभेच्छा दिल्या. पत्रकारांच्या प्रश्नावर यशवंत पवार नेहमीच आक्रमक भूमिका घेतात - फारुख मटके सर मी गेली अनेक वर्षांपासून यशवंत पवारांना पाहतोय पत्रकारांच्या प्रश्नावर ते नेहमीच जिल्हाधिकारी मुख्यमंत्री व मंत्रालयात निवेदन तसेच पत्र व्यवहार करून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करत असून पत्रकारासाठी झटणारा माणूस म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली असून यशवंत पवार यांनी पत्रकारांसाठी कायम संघर्ष केला असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस फारुक मटके सर यांनी कार्यसम्राट न्यूज च्या दुसऱ्या वर्धापन दिनास शुभेच्छा दिल्या कार्यसम्राट न्यूजमुळे अनेकांचे प्रश्न मार्गी लागले -रामचंद्र सरवदे कार्यसम्राट न्यूज हे केवळ ऑनलाइन पोर्टल नसून समाजातील तळागाळांचे प्रश्न प्रशासन दरबारात मांडण्याचे फार मोठे माध्यम असून संपादक यशवंत पवार यांनी समाजातील सर्वच घटकासाठी आपली लेखणी झिजवली असून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका कार्यसम्राट न्यूज च्या माध्यमातून मांडली असल्याचे मत पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांनी व्यक्त करून कार्यसम्राट न्यूज च्या दुसऱ्या वर्धापन दिनास शुभेच्छा दिल्या आहेत कार्यसम्राट न्यूज च्या बातमीने सामान्य माणसाला न्याय मिळतोय -अप्पासाहेब लंगोटे कार्यसम्राट न्यूजने आपली विश्वासार्हता जपली असून सर्वसामान्य माणसांच्या न्याय हक्कासाठी कार्यसम्राट न्यूज ने कधीच तडजोड केली नाही कार्यसम्राट न्यूज च्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचे प्रश्न प्रशासन दरबारात मार्गी लागत आहेत असं प्रतिपादन पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब लंगोटे यांनी यावेळी केल आहे या वर्धापन दिन कार्यक्रमास शुभेच्छा देण्यासाठी अमोल कुलकर्णी अरुण सिडगिद्दी शहाजी शिंदे गणेश निंबाळकर बंडू तोडकर महादेव शेवाळे वजीर मुलाणी शुक्राचार्य शेंडेकर सागर पवार समाधान गोडसे कैलास सुळ सागर ताठे रमेश दग्गारी राजू वग्गू रशीद शेख राजेंद्र पवार सोमनाथ मुंजे जाकीर शेख सिद्धाराम प्रसाद जगताप सिद्धाराम नंदगिरी लक्ष्मण सुरवसे अमित राठोड सिद्धू पुजारी अशोक ढोणे अमरसिंह सूळ नरेंद्र कांबळे शाहिद शेख नितीन करजोळे सावकार सादिक शेख सुहास कुलकर्णी हरिभाऊ पवार अतुल भडंगे लतीफ नदाफ असलम नदाफ शिवानंद अन्नम सिद्धाराम हमाले सह अनेक पत्रकार बांधव मोठया संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सिद्धार्थ भडकुंबे यांनी केले तर आभार अमोल कुलकर्णी यांनी मानले. सारा न्यूज नेटवर्क संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment