सारा न्यूज नेटवर्क -
“बाप्या” मराठी चित्रपटातील अपमानास्पद संवादाबाबत तक्रार व कारवाई करण्याची प्रदेशाध्यक्ष ज्ञानदेव कदम यांची मागणी..
पुणे :- “बाप्या” या मराठी चित्रपटामध्ये “चांभार चौकशी” असा अत्यंत अपमानास्पद व चर्मकार समाजाच्या भावना दुखावणारा शब्दप्रयोग करण्यात आलेला आहे.
सदर चित्रपटाचे दिग्दर्शक समीर तिवारी यांनी वापरलेला हा संवाद चर्मकार समाजाच्या स्वाभिमानाला ठेस पोहोचवणारा असून समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे.
भारत हा विविध जाती-धर्मांचा देश असून, कोणत्याही समाजाचा अपमान करणारे संवाद सार्वजनिक माध्यमातून प्रसारित होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे.
म्हणून आम्ही, संत रविदास चर्मकार युवा महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुढील मागण्या करीत आहोत
.
1.“बाप्या” चित्रपटातील “चांभार चौकशी” हा वादग्रस्त संवाद तात्काळ काढून टाकण्यात यावा
2. संबंधित दिग्दर्शक व निर्मात्यांनी चर्मकार समाजाची जाहीर माफी मागावी
3. या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी
4. वरील मागण्या पूर्ण न झाल्यास, सदर चित्रपटाचे प्रदर्शन तात्काळस्थगित करण्यात यावे
सदर चित्रपट दि. १४ मे रोजी प्रदर्शित होणार असल्याने, त्यापूर्वीच या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून न्याय द्यावा, ही नम्र विनंती.
आपण या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही कराल, अशी अपेक्षा आहे..
ज्ञानदेव काशिनाथ कदम
प्रदेशाध्यक्ष
संत रविदास चर्मकार युवा महासंघ महाराष्ट्र राज्य
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
Friday, May 1, 2026
SARA NEWS NETWORK
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment