Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, May 12, 2026

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

शालांत परीक्षेतील यशवंतांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशालेत गौरव 


सोलापूर :- भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संचलित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशालेतील माध्यमिक शालांत परीक्षेत यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

  हा कार्यक्रम शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू गायकवाड व प्रशालेचे मुख्याध्यापक महादेव यादव यांच्या हस्ते पार पडला. प्रशालेचा या परीक्षेत शंभर टक्के निकाल लागल्याने संस्थेचे कार्याध्यक्ष लक्ष्मण माने यांनी कार्यक्रमाप्रसंगी दूरध्वनीद्वारे विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षकांचे अभिनंदन केले. याप्रसंगी विष्णू गायकवाड तसेच मुख्याध्यापक महादेव यादव यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहेबराव शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन रवी देवकर यांनी केले तर किरण गायकवाड यांनी आभार मानले.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - डॉ.राम हुंडारे 

No comments:

Post a Comment