Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, May 15, 2026

SARA NEWS NETWORK



सारा न्यूज नेटवर्क - 

पेट्रोल वाचवा, पर्यावरण वाचवा"

सोलापूरच्या उपमहापौर सौ.ज्ञानेश्वरी देवकर यांचा भन्नाट निर्णय  

सरकारी गाडी सोडली, इलेक्ट्रिक बाईक पकडली 🔋

पर्यावरण रक्षक कृतिशील उपमहापौर देवकर यांनी इलेक्ट्रीकल बाईकचा चालू केला प्रवास

सोलापूर ( प्रतिनिधी) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीबाबत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी इलेक्ट्रीकल बाईकचा वापर सुरू केला आहे. महिन्याभरापूर्वी त्यांनी ही बाईक घेतली असून, शहरातील प्रभागात नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी त्या स्वतः इलेक्ट्रीकल बाईकवर जात असतात. आज त्या महापालिकेतही इलेक्ट्रीकल बाईकवर दाखल झाल्या.





गुरुवारी छत्रपती संभाजीराजे जयंतीनिमित्त जुना पुणे नाका येथे त्यांनी शासकीय वाहनाचा वापर टाळत इलेक्ट्रिक बाईकने प्रवास केला. संभाजीराजे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर त्या महापौर कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन व अभिवादन कार्यक्रमास उपस्थित राहिल्या.



उपमहापौरांचे अधिकारी-कर्मचाऱ्यांना आवाहन :

• अत्यावश्यक असेल तेव्हाच पेट्रोल-डिझेल वाहनांचा वापर करावा. • शक्य असल्यास सायकल किंवा इलेक्ट्रिक बाईकचा वापर करावा. • परिसरातील कर्मचाऱ्यांनी चालत कार्यालयात यावे. • एकत्र प्रवास करून इंधन बचतीस हातभार लावावा. • आठवड्यातून एक दिवस "नो फ्युएल डे" पाळावा. 

उपमहापौरांच्या या उपक्रमामुळे सोलापूर शहरात इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि सार्वजनिक जबाबदारी याबाबत सकारात्मक संदेश पोहोचत आहे. लोकप्रतिनिधींनी स्वतः कृतीतून आदर्श निर्माण करणे ही काळाची गरज असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - डॉ.राम हुंडारे 

No comments:

Post a Comment